कोकण

चिपळूण-सह्याद्रीतील वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर

CD

फो०टो ओळी
-rat७p२३.JPG ःKOP23M28819 चिपळूण ः डीबीजे महाविद्यालयातील कार्यशाळेत डॉ. शरद आपटे यांचे स्वागत करताना वाघमोडे.


सह्याद्रीतील वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर
डॉ. शरद आपटे ; दैनंदिन जीवनात फार मोठा उपयोग
चिपळूण, ता. ७ ः वाढते प्रदूषण, तापमान व मानवी हस्तक्षेपामुळे सह्याद्रीतील काही दुर्मिळ वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या वनस्पतींचे जतन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डीबीजे महाविद्यालयाच्या कोकण विभागातील औषधी वनस्पती या विषयावरील कार्यशाळेत वनस्पती तज्ज्ञ डॉ. शरद आपटे यांनी केले
ते म्हणाले, पश्चिम घाट अर्थात सह्याद्री हा जगातील सर्वात जास्त जैवविविधता असलेल्या आठ जागांपैकी एक आहे. इतर दुर्मिळ सजीवांसोबत येथे मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती आढळतात. या वनस्पतींचा दैनंदिन जीवनात फार मोठा उपयोग होतो. वेगवेगळ्या रोगांवर या वनस्पती अतिशय गुणकारक आहेत. आधुनिक शास्त्र या औषधी वनस्पतीचा उपयोग औषधनिर्मितीसाठी करतात. अन्न, वस्त्र, निवारा, प्राणवायू, सुगंधी द्रव्य, सौंदर्यप्रसाधन आणि वेगवेगळ्या असाध्य रोगांवर या वनस्पती गुणकारक औषध म्हणून वापरल्या जातात, असे सांगत डॉ. आपटे यांनी साधारण ५० औषधी वनस्पतींची माहिती दिली.
या दरम्यान १५० औषधी वनस्पतीचे प्रदर्शनही ठेवण्यात आले होते. या वनस्पतीच्या प्रदर्शनाची संपूर्ण मांडणी प्रा. सोनाली कदम व विद्यार्थ्यांनी पार पडली. या वेळी प्राचार्य डॉ. माधव बापट, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. बी. राजे, समन्वयक प्रा. सुहास वाघमोडे, सेक्रेटरी प्रा. पी. बी. शिवगण, जीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डी. आर. पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT