कोकण

मुरूडवासीयांना महर्षी कर्वेंच्या स्मारकाची प्रतीक्षा

CD

३६ (पान ३ साठी)

महर्षी कर्वेंच्या स्मारकाची दीर्घकाळ प्रतीक्षा

प्रस्ताव २५ वर्षाहून अधिक काळ लाल फितीत
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. २९ : महिलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर झटणारे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे दापोली तालुक्यातील मुरूड हे जन्मस्थान आहे. महर्षी कर्वे यांच्या स्मारकासाठी मुरूड ग्रामपंचायतीच्या कर्वे स्मारक समितीने मंत्रालयात प्रस्ताव सादर केला. या समितीला मंत्रालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीने स्मारकासाठी तयारी केली होती; परंतु हा प्रस्ताव सुमारे २५ वर्षे लाल फितीत अडकून पडला आहे. शासकीय अनास्थेबाबत ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
महर्षी कर्वे यांच्या स्मारकासाठी मुरूड ग्रामपंचायतीच्या कर्वे स्मारक समितीचे मंत्रालयात प्रस्ताव सादर केला होता. महर्षी कर्वे स्मारक समितीकडून स्मारकासाठी जागा शोधून तेथे स्वच्छता करण्यात आली; मात्र कर्वे यांच्या स्मारकासाठी मुरूड सज्ज असताना मंत्रालयाकडून या समितीच्या प्रस्तावाकडे सुमारे २५ वर्षे दुर्लक्ष करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुरूड पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी महर्षी कर्वे यांचे जन्मगाव म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. गावात येणारे पर्यटक कर्वे यांच्या स्मारकाची विचारणा करतात. मुरूडमध्ये वझे बंधू यांनी खासगीरित्या महर्षी कर्वे यांच्या आठवणी जतन केल्या आहेत. त्या पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी भेट देतात; मात्र शासनाकडून कर्वेंच्या स्मारकासाठी काहीच हालचाली झालेल्या नाहीत. वेळोवेळी महर्षी कर्वे स्मारक समितीकडून प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत; मात्र स्मारक प्रत्यक्ष आकार घेत नसल्याची खंत तालुक्याला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

SCROLL FOR NEXT