कोकण

तणावमुक्त जीवनासाठी छंद जोपासा

CD

35535
अणाव ः येथे आयोजित शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.


तणावमुक्त जीवनासाठी छंद जोपासा

श्रद्धा कदम ः अणावमध्ये ज्येष्ठ नागरिक दिन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : वृद्धत्व ही समस्या नाही, तर ती एक अवस्था आहे. वृद्धत्वामध्ये आपल्याला एकटे वाटू शकते. वृद्धत्वाच्या अवस्थेत ज्येष्ठांनी छंद जोपासून जीवनाचा मनमुराद आनंद लुटावा, असे प्रतिपादन कणकवली येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रद्धा कदम यांनी अणाव जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांच्या वतीने अणाव येथील आनंदाश्रय येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आनंदाश्रयाचे बबन परब, सविता परब, अॅङ. मीनाक्षी नाईक, आरोग्य सेविका एस. बी. शिंगाडे, आरोग्यसेवक एम. एस. मुसळे, समुदाय आरोग्य अधिकारी रेश्मा जंगले, समाज कल्याण विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक चित्रांगी तोरसकर, सुनील बागुल, संतोष परुळेकर, रवींद्र जाधव, आनंद कर्पे, सृष्टी रेवाळे, आरती सावंत, नैतिक बाघाटे, विकी सावंत, संग्राम कासले, विजय कदम, सुजीत जाधव, सुहास मोचेमाडकर आदी उपस्थित होते.
यावेळी कदम यांनी, वृद्धत्वामध्ये एकटेपणामुळे ताणतणाव येतो. हा ताणतणाव दूर करण्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विविध छंद जोपासणे गरजेचे आहे. दिवसभरात सहकाऱ्यांसोबत एखादे गीत गुणगुणावे. जेणेकरून ताणतणाव कमी होईल. छंद जोपासून उर्वरित आयुष्य आनंदामय वातावरणात जगू शकतो, असे सांगून विविध गीते सादर केली. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनीही यात सहभाग घेतला. अॅड. नाईक यांनी विधी सेवा प्राधिकरणामर्फत वृद्धांसाठी असणाऱ्या मोफत विधी सेवा व विविध कायद्यांची माहिती दिली. विजय कदम, संग्राम कासले यांनी मार्गदर्शन केले. यानंतर आनदाश्रयातील रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आनंदाश्रयचे बबन परब व सविता परब यांचा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमानिमित्त आपण सर्व आनंदाश्रय येथे आलात. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्येष्ठांना एक प्रकारचा मानसिक आधार मिळाला, असे परब यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन सिंधदुर्ग जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद कर्पे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT