कोकण

बहुजन मुक्ती पार्टीचे अधिवेशन 7 ला रत्नागिरीत

CD

१० (टूडे २ साठी)

बहुजन मुक्ती पार्टीचे आज रत्नागिरीत अधिवेशन
सकाळ वृत्तसेवा
जाकादेवी, ता. ६ ः रत्नागिरी जिल्हा बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जिल्हास्तरीय अधिवेशन शनिवारी (ता. ७) सकाळी ११ ते ४ या कालावधीत आयोजित केले आहे. हे अधिवेशन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह शिवाजीनगर, रत्नागिरी येथे होणार आहे.
जिल्हास्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन शांतता समिती रत्नागिरी जिल्हा कमिटीचे युयुत्सु आर्ते यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, शिवसेना आमदार राजन साळवी, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक,संभाजी ब्रिगेड रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष मिथिलेश देसाई, विधानसभा अध्यक्ष प्रमोद शेरे ,वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष काका जोशी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेशाचे राज्य संघटक सागर सुतार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारतात लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर देशातील निवडणूक मुक्त निपक्ष झाल्या पाहिजेत, शेती व शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकऱ्यांच्या हजारो समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा अनेक ज्वलंत विषयांवर जनजागृती व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. बहुजन समाजातील नागरिकांनी विचारवंतांनी या जिल्हास्तरीय अधिवेशनामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टी रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष बाळा कचरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT