कोकण

जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा

CD

२१ (पान २ साठी)


- ratchl१०१.jpg-
२३M३६९५५
चिपळूण ः डॉ. विक्रम खोत यांचा गौरव करताना प्राचार्य राजेंद्र वारे.

जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा

डॉ. विक्रम खोत ; निकम विद्यालयात मान्यवरांच्या मुलाखती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ः आधुनिक युग हे स्पर्धेचे युग आहे. आज प्रत्येक क्षेत्रात नावीन्यता आणल्याशिवाय तुमच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत नाही. बदलत्या युगानुसार त्या त्या क्षेत्रात योग्य ते बदल स्वीकारून आत्मविश्वासपूर्वक वाटचाल केलात तरच तुम्ही स्पर्धेत टिकू शकता. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. मस्ती, मजा करा; पण त्याचबरोबर आपल्या अभ्यासावरील लक्ष हटू देऊ नका. अपयशाने खचून जाऊ नका, असे आवाहन डॉ. विक्रम खोत यांनी सावर्डेतील विद्यार्थ्याना केले.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना भविष्याची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांच्या संकल्पनेतून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती हा नवोपक्रम विद्यालयांमध्ये घेतला जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्व समजण्याबरोबरच शालेय जीवनात अभ्यासाला प्राधान्य दिले तरच भविष्य उज्ज्वल घडू शकते, याची जाणीव करून देण्याचा विद्यालयाने संकल्प केला आहे. डॉ. खोत म्हणाले, मुलांना मोबाईलपासून दूर राहण्याबरोबरच सूर्यप्रकाश, योग्य आहार, दररोजचा व्यायाम, मित्रांशी गप्पागोष्टी हेच जगातील सर्वोत्तम डॉक्टर आहेत. त्यांना तुमच्या आयुष्याच्या सर्व टप्प्यावर ठेवा आणि निरोगी आयुष्याचा आनंद घ्या. या प्रसंगी विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न गौरवमूर्तींना विचारून आपल्या समस्यांची उकल करून घेतली. दहावीनंतर शिक्षणातील विविध क्षेत्रे व त्यांच्या प्रवेशपरीक्षेविषयी विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तरे त्यांनी दिली. सलीम मोडक यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून डॉ. खोत यांच्या शालेय जीवनापासून त्यांच्या यशस्वी जीवनाची पाने उलगडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT