कोकण

व्यसनमुक्ती उखाणे स्पर्धेत शीतल तेंडोलकर विजेत्या

CD

३७२२८

व्यसनमुक्ती उखाणे स्पर्धेत
शीतल तेंडोलकर विजेत्या
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः व्यसनमुक्ती सप्ताहनिमित्त व लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग, जिल्हा समाज कल्याण विभाग व नगरपंचायत कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्तीच्या प्रचार, प्रसार व प्रबोधनासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात महिलांसाठी आयोजित व्यसनमुक्ती उखाणे स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत पंधरा महिलांनी सहभाग नोंदविला. यात अनुक्रमे शीतल तेंडोलकर, साधना पालव, स्नेहा राऊळ यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीस व महामानवांची व्यसनमुक्ती विचार पुस्तिका भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधताना नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी समाजातील व्यसनाधीनता कमी करण्याच्या कार्यात महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन नगरपंचायत लिपिक गजानन पेडणेकर यांनी केले. आभार प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांनी मानले. कार्यक्रमास नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या सहकार्यातून कार्यक्रम पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT