कोकण

खारेपाटण येथे रविवापासूनधार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

CD

खारेपाटण येथे रविवापासून
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ११ : खारेपाटण येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य ब क्रीडा आदी विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या झुंजार मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रोत्सवानिमित्त १५ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत
विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. खारेपाटण शिवाजीपेठ येथील श्री विष्णू मंदिरात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यात १५ ला सकाळी ११ वाजता देवीच्या मूर्तीचे आगमन व प्रतिष्ठापना, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा खारेपाटण नं. १ च्या विद्यार्थ्यांचा शिवराज्यभिषेक सोहळा चित्ररथ देखावा व दिंडीचे आगमन, रात्री गरबा नृत्य, १६ ला रात्री १० वाजता शिवराज्यभिषेक सोहळा कार्यक्रम, १७ ला रात्री १० वाजता ग्रुप डान्स स्पर्धा, १८ ला रात्री १० महिलांसाठी पाककला स्पर्धा, १९ ला रात्री १० वाजता खुली झिम्मा फुगडी स्पर्धा, २० ला रात्री १० वाजता उखाणे स्पर्धा, २२ ला सकाळी १० वाजता होमहवन, दुपारी १ पासून महाप्रसाद, २४ ला रात्री ९ वाजता महाआरती, २५ ला सायंकाळी ५ वाजता पारंपरिक पद्धतीने देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. लकी ड्रॉ स्पर्धेची सोडत दसऱ्या दिवशी जाहीर होणार आहे. नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन झुंजार मित्रमंडळाच्या वतीने अध्यक्ष संकेत शेट्ये यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Pakistan Dialogue : आपण हिटलर नाही,पाकिस्तानशी संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत; मोहन भागवतांचे वक्तव्य चर्चेत

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

Pune: केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे ७५ अमरनाथ यात्रेकरूंचा मार्ग मोकळा; विमान रद्द झाल्यानंतर तातडीने उपलब्ध करून दिली पर्यायी व्यवस्था

SCROLL FOR NEXT