कोकण

विशाल परबांचा वाढदिवस जल्लोषात करणार

CD

37550
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना संजू परब. बाजूला दादा साहिल, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर.

विशाल परबांचा वाढदिवस
जल्लोषात करणार ःपरब

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः भाजप नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि दिमाखात येथील जिमखाना मैदानावर साजरा करण्यात येणार आहे. याकरिता प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह शो होणार असून तब्बल ५० हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे. जिल्हावासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा भाजप उपाध्यक्ष संजू परब यांनी केले.
श्री. परब यांनी आज आपल्या कार्यालयात यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. श्री. परब पुढे म्हणाले, ‘‘परब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत असताना रविवारी (ता.१५) ला येथील जिमखाना मैदानावर मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक जुबीन नौटियाल यांचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तब्बल ५० हजाराहून जास्त लोक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून सुरुवातीला या कार्यक्रमासाठी हातातील बँण्ड असलेल्या लोकांनाच प्रवेश मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु, आता बॅण्ड नाही मिळालेल्यांनाही या कार्यक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी खास करून वाढदिवसासाठी राज्यातील नेतेमंडळी उपस्थित राहणार असून त्याबाबतची माहिती मागवून देण्यात येणार आहे. शिवाय १४ ला सायंकाळी सात वाजता मोती तलावाच्या काठावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT