कोकण

ऑनलाइन व्यवहार करताना नियम पाळा ः कोल्हटकर

CD

ऑनलाइन व्यवहार करताना
नियम पाळा ः कोल्हटकर

ओरोस येथील कार्यशाळेत आवाहन

कसाल,ता. १३ ः आपण कितीही सुशिक्षित असलो तरी ऑनलाईन व्यवहारांमध्ये अनेक जणांना अडचण येते. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काटेकोर नियम पाळा, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी व्यक्त केले.
ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी नुकतीच ‘सायबर क्राईम जनजागृती’ याविषयी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी श्री. कोल्हटकर बोलत होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसिन विभागाचे डॉ. शेवाळे, डॉ. मनीष धकाटे, डॉ. बनसोडे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनीता रामानंद, शरीर रचना शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जोशी, शास्त्र विभागाचे डॉ. नितीन ढेकणे, जीवशास्त्र विभागाचे डॉ. बरंग, डॉ. कुलकर्णी, डॉ. मंगलकर आदी उपस्थित होते. यावेळी एपीआय कोल्हटकर यांनी विविध विषयावरती मार्गदर्शन केले. सध्या सायबर क्राईम हा मोठा विषय आहे. या सायबर क्राईमच्या जाळ्यामध्ये अनेकजण फसत आहेत. यात सर्वांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT