कोकण

पंधराव्या वित्तमधून 24 कोटी 60 लाख प्राप्त

CD

२५ (टूडे २ साठी, मेन)

पंधराव्या वित्तमधून २४ कोटींचा निधी

बंदीतही हप्ता वितरित; सर्वाधिक निधी रत्नागिरीला, मंडणगड तालुक्याचा शेवट क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः केंद्र व राज्य सरकारने १५व्या वित्त आयोगाचा बंदीत निधीचा हप्ता वितरित केला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला या आयोगाचा आणखी २४ कोटी ६० लाख निधी प्राप्त झाला आहे.
ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयोगातून ८० टक्के तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी १० टक्के प्रमाणे रक्कम विकासकामांसाठी मिळते. त्यापैकी सध्या दीड वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक असल्याने एकही रूपयांचा निधी मिळालेला नाही. फक्त ग्रामपंचायतींना निधी मिळाल्याने त्या मालामाल झाल्या आहेत. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, वित्त आयोगाच्या निधीचे ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणे वाटप होते. एखाद्या गावाची लोकसंख्या १० हजार असेल तर वर्षाला त्या गावाला १ कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळते. आतापर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीसह ग्रामपंचायतींना ३२२ कोटी रूपये निधी प्राप्त झालेला आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना २४ कोटी ६० रूपये निधी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला आहे. आता लोकसंख्येनुसार त्याचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वाधिक निधी हा रत्नागिरी तालुक्याला मिळाला आहे. तब्बल ४ कोटी २७ लाख रूपये ९४ ग्रामपंचायतींना मिळणार आहे. तर सर्वाधिक कमी निधी मंडणगड तालुक्याला मिळणार आहे.
-----
*तालुका*ग्रामपंचायती*निधी(रूपये)
* मंडणगड*४९*१ कोटी २ लाख
* दापोली*१०६*२ कोटी ८५ लाख
* खेड*११४*२ कोटी ८९ लाख
*गुहागर*६६*२ कोटी ३ लाख
*चिपळूण*१३०*३ कोटी ९३ लाख
*संगमेश्वर*१२६*३ कोटी २६ लाख
*रत्नागिरी*९४*४ कोटी २७ लाख
*लांजा*६०*१ कोटी ५५ लाख
*राजापूर*१०१*२ कोटी ७४ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुरळ, अस्‍वच्‍छता अन्‌ शिळे अन्न, ‘एफडीए’ची पुण्यासह विभागात कारवाई; चार हॉटेलांचे परवाने निलंबित

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT