कोकण

‘कट्टा कॉर्नर’तर्फे उद्यापासून नवरात्रोत्सव

CD

37657
संजय नाईक, आपा चिंदरकर, प्रवीण शिरसाट

‘कट्टा कॉर्नर’तर्फे उद्यापासून नवरात्रोत्सव

मंडळाच्या अध्यक्षपदी नाईक, उपाध्यक्षपदी चिंदरकर

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः येथील कट्टा कॉर्नर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे रविवारपासून (ता.१५) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळाच्या बैठकीत याबाबतचे नियोजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षपदी संजय नाईक, उपाध्यक्ष आपा चिंदरकर, सचिव प्रवीण शिरसाट, खजिनदारपदी सलील वळंजू यांची निवड करण्यात आली.
नवरात्रोत्सवानिमित्त १५ ला सकाळी श्री देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना, सायंकाळी दत्त माऊली पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ दाभोली यांचा नाट्यप्रयोग, १६ ला रात्री ९ वाजता ओंकार कलामंच सावंतवाडी यांचा कार्यक्रम, १७ ला नामांकित निमंत्रित गरबा आणि स्थानिक विवाहित महिलांचा गरबा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार असून, सोलो डान्ससाठी अनुक्रमे ३३००, २२००, ११०० रुपये, ग्रुप डान्ससाठी ५५००, ३३००, २२०० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. १८ ला सायंकाळी ४ वाजता पाककला स्पर्धा (घटक-नाचणी), रात्री ९ वाजता सूरसंगम म्युझिकल कराओके यांचा गायन कार्यक्रम, १९ ला रात्री ९ वाजता निनादेवी प्रासादिक भजन मंडळ, उंडीलचे बुवा व्यंकटेश नर व विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, आजीवलीचे बुवा प्रवीण सुतार यांच्यात २०-२० डबलबारी भजनी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. २० ला सकाळी १० वाजता कुंकुमार्चन, २१ ला रात्री ९ वाजता १५ वर्षांखालील मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे ३३००, २२००, ११०० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. यादिवशी विवाहित महिलांचा फॅशन शो व खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. २२ ला सायंकाळी ४ वाजता रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा, रात्री ९ वाजता ऑर्केस्ट्रा ''रायझिंग स्टार म्युझिकल नाईट'' गोवा, २३ ला रात्री ९ वाजता ऑर्केस्ट्रा ओंकार मेलोडीज गोवा यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम, २४ ला दुपारी महाप्रसाद व सायंकाळी ७ वाजता भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात दररोज सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत सुश्राव्य भजनांचे कार्यक्रम होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT