कोकण

सिंधुदुर्गात ‘सायबर सिक्युरीटी’ उपक्रम

CD

सिंधुदुर्गात ‘सायबर सिक्युरीटी’ उपक्रम

पोलिस दल, एमकेसीएलचा पुढाकार ः सोमवारपासून २२० शाळांमध्ये जागृती

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः सिंधुदुर्ग पोलिस व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ‘सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेस’ उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्याने कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत पोलिस काका, दिदी, जागरुक नागरीक, तसेच स्टुडंट पोलिस केडर या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, नागरिकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील २२० माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १६ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत हा उपक्रम होणार आहे.
राज्याने कम्युनिटी पोलिसींग अंतर्गत पोलिस काका, दिदी, जागरुक नागरीक, तसेच स्टुडंट पोलिस केडर या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, नागरीक यांचेत जागरुकता आणण्यासाठी वेळोवेळी उपक्रम राबविण्याबाबत सूचित केले आहे. ऑनलाईन फसवणुकीचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी सायबर सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था येथील विद्यार्थ्यांना ‘सायबर सुरक्षाबाबत’ अवगत करण्यासाठी जागरुकता निर्माण करून सायबर गुन्ह्यापासून त्यांच्यासह त्यांच्या परिवाराचा बचाव करण्याचे दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग पोलिस दल व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित सिंधुदुर्ग यांनी संयुक्तपणे १६ ते २७ ऑक्टोबर या मुदतीत ‘सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेस’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून, त्यात जिल्ह्यातील २२० माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रत्यक्ष जावून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील १३ पोलिस ठाणी, सायबर पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा व मानव संसाधन शाखांचे अधिकारी व अंमलदार सहभागी होणार आहेत. सायबर गुन्हेगार गुन्हे करताना वापरणाऱ्या क्लृप्त्या पद्धतीबाबत पोलिस दलाकडुन माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. २७ ला कार्यक्रमाच्या सांगता समारंभास पोलिस अधीक्षक अग्रवाल हे मार्गदर्शन करतील.
--------------
चौकट
सायबर कॅफे चालकांसोबत बैठक
जिल्ह्यातील सर्व सायबर कॅफे व संगणक संस्था चालकांची उद्या (ता.१४) दुपारी तीन ते पाच दरम्यान जिल्हा होमगार्ड कार्यालय, सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी येथे बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हा शाखेचे पोलिस उपअधीक्षक के. एल. सावंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT