कोकण

बुद्धिबळ स्पर्धेत वेद डोईफोडे व निधी मुळ्ये विजेयी

CD

१६ (पान २ साठी)


- rat१३p३.jpg-
P२३M३७६४७
रत्नागिरी ः जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धेतील विजेते खेळाडू.
----------

बुद्धिबळ स्पर्धेत वेद, निधी विजयी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : जिल्हा संघटनेच्या मान्यतेने रत्नागिरी चेस अॅकॅडमीमार्फत आयोजित स्पर्धेत खुल्या गटाचे विजेतेपद रत्नागिरीच्या वेद डोईफोडे याने पटकावले. मुलींच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या निधी मुळ्ये हिने सर्व सामने जिंकत पाच गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला.
मुलांच्या गटात वेदने सर्व सहा फेऱ्यांचे सामने जिंकले. आयुश रायकर याने पाच गुणांसह उपविजेतेपद प्राप्त केले. आर्यन धुळप, रुमीन वास्ता, मोहित टिकेकर व नंदन दामले यांनी अनुक्रमे तिसरा ते सहावा क्रमांक प्राप्त केला. दहा वर्षांखालील गटात आराध्य गर्दे व राघव पाध्ये सात वर्षांखालील गटात विहंग सावंत व अर्णव गावखडकर यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाची उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली. मुलींच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या निधी मुळ्ये हिने सर्व सामने जिंकत पाच गुणांसह प्रथम तर सई प्रभुदेसाई हिने साडे तीन गुणांसह द्वितीय स्थान प्राप्त केले. खेड येथील सांची शिर्के हिने तिसरा, अनन्या चव्हाण हिने चौथा तर इरा गोखलेने पाचवा क्रमांक पटकावला. मुलींच्या १० वर्षांखालील वयोगटात हर्षा भाटकर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. खुल्या व मुलींच्या गटातील प्रथम दोन खेळाडूंची निवड नाशिक येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता करण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या विवेक सोहनी, सुभाष शिरधनकर व चैतन्य भिडे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT