कोकण

भगवती देवीचे नवरात्रोत्सव

CD

३२ (पान ५ साठी)


-rat१३p१७.jpg-
२३M३७७००
रत्नागिरी ः श्री देवी भगवती
----------

रत्नदुर्गवरील श्रीदेवी भगवतीचा नवरात्र उत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : राज्यभर प्रसिद्ध असलेली रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील निवासिनी श्री देवी भगवतीचा नवरात्रोत्सव येत्या रविवारपासून (ता. १५) सुरू होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दहा दिवसांत मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. त्याकरिता देवस्थानतर्फे नियोजन करण्यात आले आहे. उत्सव २४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
रविवारी दुपारी १२ वाजता घटस्थापना होईल. १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत भजन आणि कीर्तन कार्यक्रम होतील. २२ ऑक्टोबरला दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत महाप्रसाद होईल. २३ ला श्री देवी भगवतीचा घट दुपारी १२ वाजता उठेल व रात्रौ १२ वाजता देवीचा गोंधळ आणि तटप्रदक्षिणा (आराबा) होईल. २४ ऑक्टोबरला विजयादशमी (दसरा) असून या दिवशी सायंकाळी ५ वाजता सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे. उत्सवादरम्यान दररोज पहाटे ५.३० वाजता आणि सायंकाळी ८.३० वाजता नित्यआरती होईल. नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर सज्ज झाले आहे. या ठिकाणी स्वच्छता अभियानही राबण्यात आले. रत्नदुर्ग किल्ल्यावर उत्सव काळामध्ये दरवर्षीप्रमाणे विविध प्रकारचे पूजा, प्रसाद साहित्य, खेळण्यांचे स्टॉल मांडण्यात येणार आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची उत्सव काळात रिघ लागते. उत्सव काळात भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी भगवती मंदिर पब्लिक ट्रस्ट आणि उत्सव कमिटी सदस्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT