कोकण

लांजा-चार गुरांचा मृत्यू

CD

विजेच्या धक्क्याने चार गुरांचा मृत्यू

लांजा, ता. १३ ः विजेच्या खांबावरून तुटलेल्या वाहिनीतून विजेचा धक्का लागून रानात चरणाऱ्या चार दुभत्या गुरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १३) केळंबे येथे पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये मालकाचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील केळंबे येथील राजाराम लांबोरे यांनी शुक्रवारी पहाटे गुरे लगतच्या जागेत चरायला सोडली होती. त्यावेळी त्यांचा तुटलेल्या वाहनीला स्पर्श झाला व विजेचा धक्का या दोन गाई आणि दोन म्हैशींना बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरे ओरडत असल्याने राजाराम लांबोरे त्या ठिकाणी धावत गेले असता गुरांना शॉक लागल्याचे लक्षात आले. दिवसाला सहा लिटर दूध देणाऱ्या दोन दुभत्या म्हैशी, दिवसाला दहा लिटर दूध देणाऱ्या दोन गाईचा मृत्यू झाल्याने लांबोर यांचे तीन लाखांचे नुकसान झाले. महावितरणने याचा पंचनामा केला आहे. महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गुरे मालक राजाराम लांबोरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: चंद्रामागे काय घडलं? Nasa च्या आर्टेमिस II मोहिमेदरम्यान ४० मिनिटे पूर्ण संपर्क गायब

'आम्ही कोणाची प्रॉपर्टी नाही' जान्हवी कपूर पापाराझींवर भडकली, म्हणाली...'पैशासाठी चुकीच्या पद्धतीनं फोटो काढून ते...'

IPL News: ‘इम्पॅक्ट प्लेयर’मुळे परिणाम; दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज जेमिसनची टीका

World Health Day 2026: जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम

Mumbai local Train News: जीवघेण्या लोकल गर्दीत आता १०० कंत्राटी फेरीवाले; मध्य रेल्वेचा धोकादायक प्रयोग!

SCROLL FOR NEXT