कोकण

कसालमध्ये घरात घूसून वृध्देचे दागिने पळवले

CD

कसालमध्ये घरात घूसून
वृध्देचे दागिने पळवले
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः कसाल येथे घरात घूसून वृध्द महिलेच्या गळ्यातील दागिने खेचून लंपास केल्याचा प्रकार घडला. यात सुमारे पावणे दोन तोळ्याची माळ चोरट्याने पळवली. ही घटना काल (ता.१२) पहाटे ६ च्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार जानकी रामचंद्र पवार (वय ८५ रा. कसाल, केळुसकरवाडी) यांनी आज सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल केली.
तक्रारीत जानकी पवार यांनी म्हटले आहे की, जानकी या काल सकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या सुमारास कसाल- केळुसकरवाडी येथील राहत्या घरातील सकाळी उठून बाथरूममध्ये चेहऱ्यावर पाणी मारून मागील पडवीतून घरातील मागील दरवाजाने परत येत असताना एक अनोळखी व्यक्ती पाठीमागून येऊन गळ्याला पकडून जोंधळी माळ जबरीने खेचून पळून गेला. त्या व्यक्तीने डोक्यापासून ते पायापर्यंत काळसर रंगाचे कपडे परिधान केले होते. तो अंगाने मजबूत व उंच होता. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी उपविभागीय अधिकारी स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या पथकासह सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर, उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांनी भेट दिली आहे. श्वान पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'फरसा वाले बाबा' यांच्या मृत्यूनंतर, जखमी ट्रक चालकचाही मृत्यू

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT