कोकण

कोलगावातील एकाचे आकस्मिक निधन

CD

37841
राजेश नाईक

कोलगावातील एकाचे
आकस्मिक निधन
सावंतवाडी, ता. १३ ः कोलगाव येथील राजेश गणपत नाईक (वय ४४, रा. कुंभयाळवाडी) यांचे भाड्याच्या खोलीत आकस्मिक निधन झाले. याबाबतची खबर वामन चंद्रकांत गोवेकर यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की नाईक हे सावंतवाडी पांजरवाडा येथे भाड्याच्या रूममध्ये राहत होते. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गोवेकर हे त्यांना नाश्ता घेऊन आले होते. यावेळी त्यांनी जोरजोरात हाक मारली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गोवेकर हे त्या ठिकाणाहून आपल्या कामानिमित्त बाहेर गेले. त्यानंतर बराच वेळ त्यांनी कॉल करून पाहिले असता त्याला सुद्धा प्रतिसाद आला नाही. त्यामुळे मित्रमंडळींना घेऊन साडेबारा वाजण्याच्या सुमारास नाईक यांच्या रूमचे दरवाजा फोडला. यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणावर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. नाईक हे अविवाहित होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याबाबतचा अधिक तपास पोलीस महेश जाधव करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना १० वर्षांनी दिलासा, ग्रंथालय कंत्राट प्रकरणी विशेष न्यायालयाकडून दोषमुक्त

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

Maharashtra Ganesh Visarjan Live: दगडूशेठ बाप्पा उत्सव मंडपातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ; यंदा वक्रतुंड रथातून भव्य विसर्जन मिरवणूक

Kolhapur Ganesh Visarjan : गणरायाला आज निरोप नियमभंग करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT