कोकण

ओ''नेस्ट गुरुकुलने केले वटवृक्षाचे पुनर्रोपण

CD

२० (पान ५ साठी, अॅंकर)


-rat१४p४.jpg-
२३M३७९१०
रत्नागिरी ः नाचणे येथे ओ''नेस्ट गुरुकुलमध्ये वटवृक्षाचे पुनर्रोपण केल्यानंतर त्याला पाणी घालताना डॉ. तोरल शिंदे, डॉ. नीलेश शिंदे, मिथील पित्रे आदी.
-rat१४p५.jpg-
P२३M३७९११
रत्नागिरी ः वटवृक्षाला माती घालताना सर्व महिला मंडळी.
--------

ओ''नेस्ट गुरुकुलने केले वटवृक्षाचे पुनर्रोपण

रुंदीकरणात तोडले ; वृक्षसंवर्धनाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आलेल्या वृक्षाचे पुनर्रोपण करण्याचा अभिनव उपक्रम येथील ओ''नेस्ट गुरुकुल या शाळेने शनिवारी राबविला. वटवृक्षाचे पुनर्रोपण नारायणमळी- आंबेशेत रस्ता येथील वाडेकरवाडी येथील शाळेच्या प्रांगणात करण्यात आले.
प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. तोरल शिंदे तसेच बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे यांनी अनुकरणीय उपक्रम अशा शब्दात प्रशंसा करून असे उपक्रम रत्नागिरीकरांनी राबवावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते.
डॉ. तोरल शिंदे म्हणाल्या की, ओ''नेस्ट गुरुकुलने केलेला वृक्षपुनर्रोपणाचा उपक्रम अतिशय अनुकरणीय आहे. आज केलेल्या या कार्याचा भावी काळात या शाळेतील विद्यार्थ्यांना अभिमानच वाटेल. तोडण्यात येणाऱ्या वृक्षांना जीवदान देण्याचे कार्य आपणही प्रत्येकाने करायला हवे.
शाळेच्या संचालिका नेहा पित्रे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, गुरुकुलाचे प्रतीक म्हणून वटवृक्षाची लागवड करताना रुंदीकरणासाठी तोडल्या जाणाऱ्या वृक्षाची निवड करून वृक्ष संवर्धनाचा प्रयोग केला आहे. या शाळेमध्ये मानवी नीती मूल्ये रुजवणे, समृद्ध भारतीय परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना करून देऊन त्या परंपरेशी त्यांचे नाते दृढ करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून शाळेचे कामकाज चालविले जाणार आहे. प्राचीन काळी ऋषींच्या आश्रमात वटवृक्षाच्या पारावर बसून शिष्य अध्ययन करीत असत. आजही आधुनिक शिक्षण देताना निसर्गाच्या सानिध्यात आरोग्याला पोषक असणाऱ्या वटवृक्षाच्या छायेत विद्यार्थी काही तास अध्ययन करतील. या कार्यक्रमाला शाळेचे संचालक मिथिल पित्रे, हितचिंतक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
--------
कोट
परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि सर्वाधिक प्राणवायू देणारा वृक्ष म्हणून वटवृक्षाची निवड केली. भविष्यातही अशा प्रकारचे वृक्ष पुनर्रोपण करण्याचा शाळेचा मानस आहे.
--नेहा पित्रे, संचालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT