कोकण

कोकण किनारपट्टीला वाढता धोका; चक्रीवादळ निवारणावर 5 गावात होणार तालीम

CD

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाच्या वाढता धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने सुरक्षेच्यादृष्टीने भक्कम पावले उचलली आहेत. जिल्ह्यात प्रथमच याअनुषंगाने आपत्काली परिस्थितीला तोंड देणारी राज्यस्तरीय रंगीत तालीम होणार आहे. चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी ७ नोव्हेंबरला टेबलटॉप एक्झरसाईज अर्थात नियोजन, तर ९ नोव्हेंबरला प्रत्यक्ष राज्यस्तरीय रंगीत तालीम होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ५ गावांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्ह्यातील आंबोळगड (ता. राजापूर), गणपतीपुळे (ता. रत्नागिरी), वेलदूर (गुहागर), कर्दे (दापोली) आणि वाल्मिकीनगर (मंडणगड) या गावांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील या ५ गावांमध्ये ९ तारखेला सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान होणाऱ्या रंगीत तालमीच्या अनुषंगाने विशेष नियोजन करण्यात येणार आहे. चक्रीवादळ आपत्ती निवारण रंगीत तालमीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, करण्यात येणारे उपाय योजना, साधनसामुग्री उपलब्धता, मनुष्यबळ, किनाऱ्यावरील नागरी वस्तीचे स्थलांतरण, करावयाची कार्यवाही, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, निवारा केंद्रे, फूड पॅकेट आदींबाबत आजच्या बैठकीत मार्गदर्शन केले.

चक्रीवादळ आपत्ती निवारणविषयी होणाऱ्या रंगीत तालमीच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत दूरदृश प्रणालीद्वारे बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, पोलिस उपअधीक्षक नीलेश माईनकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवारा शेड रखडलेलेच

कोकण किनारपट्टीवर गेल्या काही वर्षांमध्ये फियान, तौक्ते, निसर्ग, महाचक्रीवादळ अशा अनेक चक्रीवादळांचा किनारपट्टीला मोठा फटका बसला. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी झाली. भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागणार असल्याने राज्य शासनाने याबाबतची पावले उचलली आहेत. यापूर्वी चक्रीवादळ सौम्यीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, मंजूर तीन निवारा शेडचे काम मात्र कासवाच्या गतीने सुरू आहे. चक्रीवादळामध्ये किनारपट्टीभागातील नागरिकांना या शेडचा आसरा असणार आहे. परंतु, अद्याप हे काम रखडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Rising Stars: तिलक वर्माच्या भारतीय संघाचं आव्हान सेमीफायनलमध्येच संपलं! श्रीलंकेकडून दारुण पराभव

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

SCROLL FOR NEXT