Tourism increased Devgad taluka  
कोकण

Grampanchayat Election: भाजप-ठाकरे शिवसेनेत चुरस, देवगडात ९ ग्रामपंचायतींसाठी लढती

CD

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ः तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची रंगत आता अंतिम टप्यात पोचली आहे. निवडणूकीमुळे संबधित गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून विजयासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. सर्वसाधारणपणे भाजप विरूध्द ठाकरेगट शिवसेना अशीच चुरस रंगण्याची शक्यता अधिक आहे. ८ सरपंच जागांसाठी १८ तर ४१ सदस्य जागांसाठी एकूण ८३ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी रविवारी (ता.५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून सोमवारी (ता. ६) मतमोजणी होणार आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये वळीवंडे, शिरवली, रामेश्‍वर, पावणाई, फणसगांव, विठ्ठलादेवी, वानिवडे, तिर्लोट, ठाकूरवाडी आदी ९ ग्रामपंचयातींचा समावेश आहे.

ठाकूरवाडी येथील सरपंच पदासाठीची एक जागा बिनविरोध झाल्याने आता ८ सरपंच जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सदस्य पदासाठीच्या ६९ जागांपैकी ठाकूरवाडीमध्ये दोन सदस्य जागांवर अर्ज न आल्याने ६७ जागांपैकी एकूण २६ जागा बिनविरोध झाल्याने आता ४१ सदस्य जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. ठाकूरवाडीमध्ये दोन सदस्य जागांवर अर्ज न आल्याने त्या जागा रिक्त राहिल्या आहेत. तेथे केवळ एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत.

वळिवंडे ग्रामपंचायतीमध्ये केवळ सरपंच पदासाठी दुरंगी लढत होत असून तेथे सदस्य पदाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत. ठाकूरवाडीमध्ये सरपंच जागा बिनविरोध ठरली आहे. विठ्ठलादेवीमध्ये सदस्य पदाच्या पाच जागा बिनविरोध ठरल्या आहेत. तेथे सरपंच आणि दोन सदस्य जागांसाठी लढत आहे. वानिवडेमधून सदस्य पदासाठीच्या चार जागा, वळिवंडेमधून सदस्य पदासाठीच्या सर्व ७ जागा, ठाकूरवाडीमध्ये चार जागा, शिरवलीमधून एक, पावणाई मधून चार तर फणसगांवमधून एक जागा बिनविरोध ठरली आहे. सदस्य पदासाठी बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत आहे. त्यामुळे मोठी चुरस आहे.

चौकट
सरपंच निवडीमध्ये चुरस
९ ग्रामपंचायतीमध्ये एक जागा बिनविरोध झाल्याने सर्वरित आठमध्ये सरपंच पदासाठी तिर्लोट आणि फणसगांवमध्ये तिरंगी तर रामेश्‍वर, विठ्ठलादेवी, वानिवडे, वळिवंडे, शिरवली, पावणाई याठिकाणी दुरंगी लढत रंगणार आहे. तिर्लोट आणि फणसगांव येथे मोठी चुरस आहे. वळिवंडे ग्रामपंचायतीमध्ये केवळ सरपंच पदासाठी दुरंगी लढत होत असून तेथील सदस्य पदाच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत.

चौकट
दिवाळीआधीच राजकीय फटाके
सरपंच पदासाठी थेट लढती असल्याने राजकीय पक्षाचे लक्ष त्याकडे आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने याकडे रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. अधिकाधिक सरपंच जागा जिंकण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चुरस राहणार आहे. यासाठी प्रचाराची रंगत वाढली होती. सोमवारी (ता. ६) निकाल असल्याने दिवाळी आधी राजकीय फटाके फुटणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT