कोकण

रोणापालमध्ये विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप

CD

ओटवणे : सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्यावतीने रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र चिकित्सा करून गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे देण्यात आले. येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विशाल पाटील यांनी दयासागर छात्रालयातील सर्व विद्यार्थ्यांची नेत्र चिकित्सा केली.

त्यानंतर नंबरचा चष्मा आवश्यक असलेल्या अभिताय शेटकर, साईश जाधव, तन्मय मोरजकर, आदर्श सावंत, भावेश सावंत, काशिनाथ मुळीक, भूषण करंजेकर या सात विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आले. यावेळी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, नेत्र रोगतज्ज्ञ डॉ. पाटील, दयासागर छात्रालयाचे व्यवस्थापक जीवबा वीर, पत्रकार मंगल कामत, दीपक गावकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. वीर यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.

रामचंद्र चौकेकर, स्नेहा तुळसकरची निवड
सावंतवाडी :
नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॅन्डबॉल क्रीडा स्पर्धेसाठी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा या शाळेचा विद्यार्थी रामचंद्र सौंदेकर याची १९ वर्षांखालील गटामध्ये तर १९ वर्षांखालील मुलींच्या हँडबॉल स्पर्धेसाठी याच शाळेतील स्नेहा तुळसकर हिची निवड झाली. या स्पर्धा नाशिक येथे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केल्या आहेत.

याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर यांनी खेमराज इंग्लिश स्कूल बांदा या शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविले आहे. दोन्ही विद्यार्थ्यांचे खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापकांनी व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेतील शोधमोहीम ८३ तासांनी संपली; अखेरच्या बेपत्ता कामगाराचाही मृतदेह सापडला, मृतांचा आकडा ९ वर

आजचे पंचांग 12 जुलै 2026! प्रदोष, शिवरात्री, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Sangli Politics : जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे पद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आता 15 दिवसांत काय होणार?

IND vs ENG 5th T20I: भारतीय संघाचा सुपडा साफ! इंग्लंडने मालिका ४-० ने खिशात घातली; श्रेयस अय्यरच्या संघाचे वस्त्रहरण...

Cheese Omelette Paratha: ब्रेड-ऑम्लेटला द्या ब्रेक! रविवारी बनवा हा भन्नाट चिज ऑम्लेट पराठा

SCROLL FOR NEXT