कोकण

दुचाकी-रिक्षा अपघातामध्ये पोलिसाच्या हाताची बोटे तुटली

CD

दुचाकी-रिक्षा अपघातामध्ये
पोलिसाच्या हाताची बोटे तुटली

सावंतवाडी शहरातील अपघात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः येथील पोलिस ठाण्याचे वाहतूक पोलिस कर्मचारी राजेंद्र मुरारी राणे (रा. इन्सुली) हे सावंतवाडीत झालेल्या दुचाकी रिक्षा अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉत) उपचार सुरू आहेत. हा अपघात आज दुपारी दोनच्या सुमारास शहरातील कारागृहानजीक घडला.
याबाबत अधिक माहिती अशी ः अपघातातील रिक्षाचालक नारायण शिवराम राऊळ (रा. नाणेली, ता. कुडाळ) हे आपल्या खासगी कामानिमित्त पत्नी व मुलीसह सावंतवाडीत आले होते. ते शहरातील कारागृहाच्या बाजूने असलेल्या रस्त्याने जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर आले असता समोरून तीन मुशीकडून पोलिस ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या पोलिस कर्मचारी राणे यांच्या ताब्यातील दुचाकीची धडक रिक्षाला बसली. यात श्री. राणे हे दुचाकीसह रस्त्यावर कोसळून काही अंतर फरफटत गेले. यात त्यांच्या हाताची दोन बोटे रस्त्यावर तुटून पडली. त्यानंतर त्यांना तेथील नागरिकांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलवले. त्यावर त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) हलविण्यात आले. अपघातानंतर पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. या संदर्भात पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT