कोकण

विठ्ठलाची २१ फुटी मूर्ती धार्मिक पर्यटकांचे ठरणार आकर्षण

CD

विठ्ठलाची २१ फुटी मूर्ती
ठरणार पर्यटकांचे आकर्षण
रत्नागिरी, ता. १५ : शहरातील माळनाका येथील शिर्के गार्डनमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाची २१ फुटी मूर्ती उभारली जाणार आहे. ही मूर्ती धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या मोठे आकर्षण ठरणार आहे. यावर १ कोटी २७ लाख रुपये खर्च होणार असून त्याचा चबुतराच ८ फुटाचा असणार आहे.
रत्नागिरी शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्यादृष्टीने आणि एक मॉडेल सिटी व्हावी यासाठी मंत्री उदय सामंत याचा प्रयत्न आहे. त्यासाठी पायाभूत सविधांसह शैक्षणिक सुविधा, पर्यटनाला चालना देणारे उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत. तब्बल १५७ कोटीची विकासकामांची सुरवात १७ तारखेपासून होणार आहे. मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असल्याने शहरवासीयांना खड्डेमुक्त रस्ते भविष्यात मिळणार आहेत. सुमारे ९६ कोटीचे हे काम आहे. रस्त्याच्याकडेला काँक्रिट पाईप बसवण्यात येणार आहेत. त्यावर हेवी पेवरब्लॉक टाकण्यात येणार आहेत. या पाईपमधून भविष्यात विद्युत, पाणी, गॅस आधी पाइपलाइन जाणार आहेत. रस्त्याची खोदाई हा विषय यापुढे राहणार नाही. ध्यानकेंद्रासाठी ५ कोटी खर्च केले जाणार आहेत. थिबा पॅलेस येथे खुल्या नाट्यगृहासाठी २० कोटी रुपये दिले जाणार आहेत. पर्यटनाच्यादृष्टीने ते महत्वाचे ठरणार आहे. जिजामाता उद्यानसह खाऊगल्ली विकसित करण्याआधी भरीव निधी देण्यात आला आहे. शहरातील तेलीआळी येथे गार्डन विकसित करण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आठवडा बाजार येथील शॉपिंग सेंटर नव्याने उभारले जाणार आहे. त्यासाठी ३ कोटी ३९ लाख रुपये खर्च होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT