ayushman bharat card sakal
कोकण

आयुष्यमान कार्ड योजनेत राज्यात सिंधुदुर्ग आघाडीवर; ५ लाखाचा आरोग्य विमा मोफत, जाणून घ्या प्रक्रिया

जिल्ह्यातील एकूण ६ लाख ६२ हजार ९४ पात्र लाभार्थी पैकी आतापर्यंत ३ लाख ३६ हजार ७६५ जणांनी आयुष्मान कार्ड काढले आहे

सकाळ वृत्तसेवा

Ayushman Bharat CARD sindhudurg

सिंधुदुर्गनगरी : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची कार्ड काढण्यात सिंधुदुर्ग जिल्हा कोकण विभागासह राज्यात आघाडीवर आहे. या योजनेत जिल्ह्याने आतापर्यंत ५१ टक्के काम पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील एकूण ६ लाख ६२ हजार ९४ पात्र लाभार्थी पैकी आतापर्यंत ३ लाख ३६ हजार ७६५ जणांनी आयुष्मान कार्ड काढले आहे. अद्यापही ३ लाख २५ हजार ३२९ लाभार्थींचे (४९ टक्के) कार्ड काढणे बाकी असून हे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची महत्वकांशी आरोग्य विमा योजना असून या योजनेच्या लाभार्थीला एकूण ५ लाखाचा आरोग्य विमा मोफत दिला जाणार आहे. जिल्ह्यात ६ लाख ६४ हजार ०९४ एवढे लाभार्थी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. सरकारने ही योजना गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी सुरू केली आहे. आदिवासी एससी, एसटी, बेघर, निराधार किंवा भिक्षा मागणारी व्यक्ती इत्यादींसाठी ही योजना विमा आणि हमी तत्त्वावर राबविण्यात येते. एकत्रित योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या कुटुंबापैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना, २०११ च्या यादीतील एसईसीसी डाटाबेसनुसार लाभार्थी निवडले गेले आहेत.

ई कार्ड कुठे काढता येईल? (how can i get ayushman bharat e card)

पात्र लाभार्थीनी आयुष्मान भव योजनेचे ई-कार्ड मिळवण्यासाठी जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार केंद्र वा योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयातील आरोग्य मित्राकडे तसेच रेशन दुकानात जाऊन कार्ड काढावे, तेथे ही सेवा उपलब्ध आहे. यासाठी स्वतः लाभार्थी, ओरिजिनल रेशनकार्ड, आधारकार्ड लिंक असलेला मोबाइलची आवश्यकता आहे. सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यास या योजनेचा लाभ मिळावा, लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, म्हणून योजनेत अंगिकृत असलेल्या रुग्णालयाद्वारे आणि आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ग्रामीण आणि शहरी भागात मोफत कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याने आयुष्यमान कार्ड योजनेच्या कामात आघाडी घेतली असून कोकण विभागातील ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्याच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली आहे. कोकण विभागातील अन्य जिल्ह्यांचे काम अद्यापही ४० टक्केहून कमी आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याची आघाडी कायम ठेवण्यासाठी तसेच १०० टक्के उदिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. ग्रामीण भागातील कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, आशा कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन प्रत्येक लाभार्थीचे आयुष्यमान कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.

शहरी भागात प्रतिसाद कमी
जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात या योजनेच्या कामात गती आलेली दिसत नाही. जिल्ह्यातील नगरपंचायत कार्यक्षेत्रातील लाभार्थींचे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज असून आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी नगरपंचायत विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

शासनाच्या आयुष्यमान भव योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ६ लाख ६२ हजार ०९४ एवढे लाभार्थी पात्र आहेत. त्यापैकी ३ लाख ३६ हजार ७६५ एवढ्या लाभार्थींची कार्ड काढली आहेत. जिल्ह्यात ५१ टक्के काम पूर्ण झाले आहे. दर दिवशी ४ ते ५ हजार एवढी कार्ड काढली जात असून उर्वरित ३ लाख २५ हजार ३२९ लाभार्थीचे कार्ड काढण्यासाठी प्रयत्न सुरु असून जिल्ह्यातील नगरपंचायती तसेच शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक-प्राचार्य यांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.
- डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग

आयुष्यमान कार्ड योजनेचे काही पात्र लाभार्थी जिल्ह्याबाहेर वास्तव्यास आहेत, असे दिसून आले आहे. यामुळे उदिष्ट पूर्ण करताना अडचण येत आहे. तरी अशा पात्र लाभार्थीनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून आपली आयुष्यमान कार्ड काढून घ्यावीत-
- डॉ. संदेश कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT