कोकण

अनुसूचित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना आवाहन

CD

अनुसूचित शिष्यवृत्तीधारक
विद्यार्थ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ ः विद्यार्थ्यांनी निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.
केंद्राने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या १७ मार्च २०२२ व ७ जुलै २०२३ या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्राची ६० टक्के हिश्शाची रक्कम महाडीबीटी प्रणालीदवारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा झाल्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून उर्वरित शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, इतर ना परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयास ७ दिवसांच्या आत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची २०२१-२२ व २०२२-२३ वर्षातील केंद्राची ६० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या रकमेमधून निर्वाह भत्त्याची ६० टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी, असे आवाहन शिष्यवृत्ती पात्रताधारक विद्यार्थ्यांना केली आहे; अन्यथा त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील, असे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

Pune Voter Mapping: वडगाव शेरीत सव्वा लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण; उर्वरित मतदारांना SIR मोहिमेत लवकर सहभागी होण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT