कोकण

गोळप ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी द्या

CD

.१० (पान २ साठी)

गोळप ग्रामपंचायतीला
ग्रामविकास अधिकारी द्या

पावस, ता. ६ ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी देण्यात यावा अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात येईल, असे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत सदस्य अविनाश काळे यांनी दिले आहे.
गोळप ग्रामपंचायत ही पाच महसुली गावांची ग्रुपग्रामपंचायत आहे. लोकसंख्या सुमारे दहा हजारापेक्षा जास्त आहे. महसूल सुमारे साठ लाख रुपये आहे; मात्र सुमारे नऊ महिने ग्रामपंचाय‌तीला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नाहीत. ग्रामविकास अधिकारी भगत यांच्याकडे कोळंबे ग्रामपंचायतीचा अतिरिक्त भार आहे. कोळंबे येथे किमान दीड दिवस त्यांना द्यावा लागतो. त्यामुळे राहिलेल्या साडेतीन दिवसात गोळपसारख्या ग्रामपंचायतीचा कारभार पूर्ण होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान होत आहे. प्रशासकीय कामकाज, पत्रव्यवहार विकासकाम आदी गोष्टींना मर्यादा येत आहेत. त्यामुळ गोळपचे ग्रामविकास अधिकारी भगत यांच्याकडे पूर्णवेळ कार्यभार देण्यात यावा. येत्या महिनाभरात याबाबत कार्यवाही न झाल्यास नाइलाजाने ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचे आंदोलन करावे लागेल, असे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

Dapoli News : कोकण दीपकाडीला जागतिक व्यासपीठ; संवर्धनासाठी जनतेला मतदानाचे आवाहन

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

SCROLL FOR NEXT