कोकण

गोगटे कॉलेजच्या नवउद्योजक विद्यार्थ्यांची झेप

CD

२१ (पान २ साठी)


-rat६p१३.jpg-
२४M५६१८७
रत्नागिरी : वुमेन्स कार्निव्हलमध्ये गोगटे कॉलेजच्या नवउद्योजिकांनी लावलेल्या स्टॉलसह डॉ. आनंद आंबेकर, हेमंत वणजू आदी.
-----------
‘गोगटे’च्या विद्यार्थ्यांनींची झेप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी स्वायत्त झाल्यानंतर अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आले. त्यात नवउद्योजकांसाठी अभ्यासक्रम सुरू केला सुरू केला. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक मिळावे म्हणून सांस्कृतिक महोत्सवामध्ये कौशल्यावर आधारित झेप सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले. यात विद्यार्थ्यांनी स्टॉल लावून उद्योजकतेचे धडे गिरवले. याच विद्यार्थ्यांना वुमेन्स कार्निव्हलमध्ये सहभागाची पुन्हा संधी मिळाली आहे.
महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवात सात कौशल्यावरत गट तयार केले. नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य, हस्तकला, फॅशन आणि नवउद्योजक कौशल्य यांच्या स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित केले. महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संस्था पातळीवर सहकार्य देण्यात आले.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हेमंत वणजू यांनी झेप महोत्सवाचे समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांची भेट घेऊन वुमेन्स कार्निव्हल व नवउद्योजकांना मोफत स्टॉल लावण्यास प्रोत्साहन देऊ, असे सांगितले. त्यानुसार चार स्टॉल मोफत दिले आहेत. वुमेन्स कार्निव्हलचा रविवारी (ता. ७) अखेरचा दिवस आहे. विद्यार्थिनींना व्यवसायाची संधी मिळाली आहे. व्यवसाय करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक आणि मित्रमैत्रिणी त्यांना प्रोत्साहन देत आहेत. नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी वुमेन्स कार्निवलला भेट देऊन विद्यार्थीनी नव नवउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन डॉ. आंबेकर, प्रा. परेश गुरव, प्रा. उज्वल कांबळे, पूर्वा कदम यांनी केले आहे. महोत्सवाच्या ठिकाणी आर्या वंडकर, पर्णिका तिवरेकर सहकार्य करत आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT