कोकण

‘ई-केवायसी’ला १५ दिवसांची मुदत द्या

CD

56218
वेंगुर्ले ः ई-केवायसीला मुदतवाढ मिळण्याबाबत ठाकरे गटातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

‘ई-केवायसी’ला १५ दिवसांची मुदत द्या

ठाकरे गट ः वेंगुर्लेत गॅस ग्राहकांच्या तक्रारींबाबत निवेदन

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ६ ः वेंगुर्ले शहरासह तालुक्यासाठी कार्यरत असलेल्या येथील गॅस एजन्सीमार्फत सध्या गॅस ग्राहकांची गॅस कनेक्शनबाबत ई-केवायसी करण्याचे काम सुरू आहे; मात्र काही ग्राहकांच्या मोबाईलवर मॅसेज टाकून दोन दिवसांत ई-केवायसी करण्याची तारीख दिली जाते. अचानक आलेल्या व दोन दिवसांच्या मुदतीमुळे बाहेर गावी कामानिमित्त गेलेल्या किंवा उपचारासाठी गेलेल्या ग्राहकांना अडचण निर्माण होते. या संदर्भात आलेल्या तक्रारींनुसार तालुक्यातील प्रत्येक गावात ई-केवायसी ठिकाण निर्माण करून १५ दिवसांची मुदत मिळावी, अशी वेंगुर्ले ठाकरे गटातर्फे करण्यात आली आहे. याबाबत तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ले तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रकाश गडेकर, अजित राऊळ, उमेश नाईक, नीलेश चमणकर, नित्यानंद शेणई, महादेव काजरेकर, गजा गोलतकर, अभी मांजरेकर, संदीप पेडणेकर व वाल्मिकी कुबल आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, गॅस ग्राहकांकडे याबाबत केलेल्या चौकशीत येथील गॅस सर्व्हिसने पेट्रोलियम मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशानुसार देशातील प्रत्येक गॅस ग्राहाकाला ई-केवायसी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार तालुक्यातील तिसही गावांत संबंधित गॅस सर्व्हिस एजन्सीच्या २३ हजार ग्राहकांची ई-केवायसी केली जाणार आहे; परंतु एकाच ठिकाणी या ग्राहकांची ई-केवायसी होणार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन दूरवरील ग्राहकांना शारीरिक व मानसिक त्रास, आर्थिक भुर्दंड होणार आहे. यातून वाद निर्माण झाल्यास शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे.
--
ई-केवायसी केंद्र आवश्यक
समस्या टाळण्यासाठी गॅस एजन्सीमार्फत तीस ठिकाणी ई-केवायसी केंद्र निर्माण केले जावे. ई-केवायसीसाठी लागणारी कागदपत्रांची माहिती दिली जावी व ई-केवायसी करण्याची मुदत १५ दिवसांची करावी. तालुक्याचे अधिकारी या नात्याने तहसीलदारांनी या संदर्भात गॅस सर्व्हिसच्या संचालक किवा व्यवस्थापकांना बोलावून माहिती देऊन ती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी. जेणेकरून गॅस ग्राहकांचे नुकसान टाळले जाई, असे निवेदनात नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT