कोकण

सह्याद्रीच्या रोड मॅप अँड एअर पावर कन्वर्टर इलेक्ट्रिसिटीला प्रथम

CD

१६ (पान २ साठी मेन)

-rat६p२४.jpg-
२४M५६२१५
सावर्डे ः विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या प्रतिकृती पाहताना मान्यवर.
---------
‘रोड मॅप अँड एअरपॉवर इलेक्ट्रिसिटी’ प्रथम

सावर्डे येथे विज्ञान प्रदर्शन ; ११७ विविध प्रतिकृतींचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा

सावर्डे, ता. ६ ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ‘रोड मॅप अँड एअरपॉवर कन्वर्टर इलेक्ट्रिसिटी’ला प्रथम तर द्वितीय क्रमांक राजापूर हायस्कूलच्या आधुनिक गोठा व तृतीय क्रमांक जामगे येथील छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूलच्या रसायनविरहित भाज्या व फळे यांना गौरवण्यात आले.
या विद्यार्थ्यांचा अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव महेश महाडिक, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, गोपाळ चौधरी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे आदींच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रदर्शनामध्ये उच्च प्राथमिक गट २७ प्रतिकृती, माध्यमिक गट २७ प्रतिकृती, अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य – प्राथमिक शिक्षक १८ प्रतिकृती, अध्यापक निर्मित माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य १८ प्रतिकृती, प्रयोगशाळा सहाय्यक परिचर ९ प्रतिकृती, दिव्यांग विद्यार्थी ९ प्रतिकृती व प्रश्नमंजुषेसाठी ९ तालुक्यातील ९ गट अशा एकूण ११७ प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. उच्च प्राथमिक स्तर सहावी ते आठवी निकम विद्यालयाच्या आयुष पवार व ओम तेटांबे यांनी बनवलेल्या रोड मॅप अँड एअरपॉवर कन्वर्टर इलेक्ट्रिसिटीला प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक राजापूर हायस्कूलच्या माधव महेश पवार व जिग्नेश भुवड यांनी साकारलेल्या आधुनिक गोठाला देण्यात आला. तृतीय क्रमांक जामगेच्या छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूलच्या रसायनविरहित भाज्या व फळे यांना देण्यात आला.
माध्यमिक विभागात नववी ते बारावीत प्रथम क्रमांक भरणे येथील नवभारत हायस्कूलच्या दुर्गेश देसाई व सुजित डोणगावे यांनी तयार केलेल्या सौर वाळवणी यंत्राला, द्वितीय क्रमांक पालीतील मराठा मंदिरच्या वेदांग भस्मे, दर्शील कुशे यांनी केलेल्या स्मार्ट टॉयलेटला, तृतीय क्रमांक पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूलच्या साई सस्ते व अथर्व विचारे यांनी बनवलेल्या वायरलेस इलेक्ट्रिसिटी ट्रान्स्फर सिस्टिमला देण्यात आला. उच्च प्राथमिक स्तर अध्यापक (सहावी ते आठवी), संतोष चव्हाण (पिरंदवणे), सचिन चिले (आंबडस), धनाजी देसाई (दोणवली) यांच्या प्रतिकृतींनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. माध्यमिक अध्यापक स्तर (नववी ते बारावी) या गटामध्ये संचिता कदम (निकम विद्यालय), सुनील मदने (पाचल), राजाराम हिंग्लजे (विरसई) यांच्या प्रतिकृतींनी क्रमांक मिळवले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले असून यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
--------
दिव्यांग विद्यार्थ्यांचीही चमक

दिव्यांग विद्यार्थी विभागामध्ये कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या सुमेश गुरव व प्रथमेश कुंभार यांनी तयार केलेल्या बहुपयोगी आधुनिक विकलांग वॉकरला प्रथम, करंजाळे येथली न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रदीप मळेकरने तयार केलेल्या नैसर्गिक आपत्ती सुरक्षित घराला द्वितीय आणि पावस येथील काझी हायस्कूलमधील झयान मुकादम हिच्या गॅस डिटेक्टर सेंसरला तृतीय क्रमांक मिळाला.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बघा, गद्दार चालले! काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या केंद्रीय मंत्र्याला राहुल गांधींनी डिवचलं; मंत्री म्हणाले, हे देशाचे शत्रू

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने दिली धडक, पुण्यात सीएनजी पंपासमोरील घटना, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Thane Crime: प्रेयसीसोबत लग्नाला परवानगी दे, असं सांगितलं अन् तीन मुलींसह पत्नीला घराबाहेर काढलं, धक्कादायक कारण समोर

Jayant Patil : वाळवा तालुक्यात सत्तासंघर्ष तीव्र! जयंत पाटीलांची भिंगरी, महायुतीचा बालेकिल्ला ढवळून निघाला

Photos : ओसाड जमिनीत सापडला १००० वर्ष जुना सांगाडा; 'समाधी' मुद्रा पाहून जगभर सगळेच आश्चर्यचकित, पाहा व्हायरल फोटो

SCROLL FOR NEXT