Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर..

Breaking Marathi News live Updates 03 August 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

९६० कुटुंबांचे आरोग्य धोक्यात, नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा; ‘जल जीवन मिशन’चा फज्जा

गोंदिया ( लाखांदूर) शासनाच्या 'जल जीवन मिशन' अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करूनही तालुक्यातील भागडी गावाला गेल्या वर्षभरापासून गाळयुक्त दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे गावातील तब्बल ९६० कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

'हर घर नल, हर घर जल' योजनेअंतर्गत भागडी गावात विहीर, बोरवेल, पाणी शुद्धीकरण केंद्र आणि पाइपलाइनसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्यात नदीतील गाळयुक्त दुषित पाणी थेट विहिरीत जाते. पाणी शुद्धीकरण केंद्र कुचकामी ठरल्याने आणि पाइपलाइन लिकेज असल्याने हेच अशुद्ध पाणी टाकीत जमा होऊन थेट नागरिकांच्या घरात पोहोचत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com