कोकण

ओटवणेची विकासाकडे घोडदौड

CD

56270
ओटवणे ः ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण करताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर. शेजारी इतर.

ओटवणेची विकासाकडे घोडदौड

पालकमंत्री रवींद्र चव्हाण ः नूतन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ६ ः ओटवणे गावाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या गावाच्या शैक्षणिक विकासासह सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर राहू, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
ओटवणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्‍घाटन पालकमंत्री चव्हाण व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ५) करण्यात आले. ओटवणे ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. अखेर २०१९-२० जिल्हा वार्षिक नियोजनमधून १० लाख व आमदार निधीमधून १० लाख असे २० लाख रुपये शिक्षणमंत्री केसरकरांच्या माध्यमातून मंजूर झाले. त्यानंतर ओटवणेची सुसज्ज ग्रामपंचायत इमारत उभी झाली.
उद्‍घाटन प्रसंगी माजी आमदार राजन तेली, सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, तालुकाध्यक्ष नारायण ऊर्फ बबन राणे, विकास सावंत, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी सरपंच उत्कर्षा गावकर, रवींद्र म्हापसेकर, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, प्रशांत बुराण, ग्रामपंचायत सदस्या मनाली गावकर, समीक्षा गावकर, संजना जाधव, लावण्या तावडे, अस्मिता भगत, उमेश गावकर, सगुण गावकर, ग्रामसेवक आरती चव्हाण, ग्रामसेवक अमित राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद, रात्री भजन व त्यानंतर दशावतार नाट्यप्रयोगाने या कार्यक्रमाची सांगता झाली. सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांनी आभार मानले.
................
चौकट
‘गाव विकासात राजकारण नको’
गावच्या विकासात कुणीही राजकारण न करता राजकीय पादत्रणे बाहेर ठेवत एक येणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत इमारतीच्या सभोवताली प्लेविंग ब्लॉक बसविण्यासाठी लवकरच निधी देण्यात येईल, असे यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT