कोकण

चिपळुणात बेकायदा सावकारी करणाऱ्यांची दहशत

CD

६ (पान ५ साठीमेन)

चिपळुणात खासगी सावकरांची दहशत

आत्तापर्यंत तिघांवर कारवाई ; नागरिकांची तक्रार देण्यास टाळाटाळ

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः तालुक्यात बेकायदा सावकारीचा आणि खंडणीचा धंदा जोरात फोफावला आहे. कर्जदारांकडून भरमसाट दराने व्याज आकारणी आणि त्यावर दंडव्याजाची रक्कम वसूल करायची. त्यानंतर पुन्हा जादा पैशांची मागणी, पैसे न दिल्यास मारहाण, जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत. तालुक्यात तिघांच्या विरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर बेकायदा सावकारी करणाऱ्यांच्या विरोधात उघडपणे तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे; मात्र अनेकजण भितीपोटी तक्रार देत नसल्याचे चित्र आहे.
एखादी व्यक्ती आर्थिक अडचणींमुळे कर्ज घेण्यासाठी बॅंकेत जाते; परंतु तेथे अर्जासोबत कागदपत्रे, तारण, त्याच बॅंकेतील सभासद असलेली व्यक्तीच जामीनदार हवी यांसह विविध अटींची पूर्तता करावी लागते. त्याची पूर्तता न केल्यास बॅंक कर्ज देत नाही. व्यक्तीला शेवटी नाइलाजास्तव सावकाराकडे जावे लागते. त्यात पुन्हा बेकायदा सावकारी. हे सावकार कर्जदारांकडून मुद्दल, व्याज, दंडव्याज आकारतात. बऱ्याचदा मुद्दलाच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम जास्त असते. मुद्दल परत करूनही जादा पैशांसाठी बेकायदा सावकारांकडून कर्जदारांना घरी जाऊन शिवीगाळ, मारहाणीचे प्रकार सुरू आहेत. जामीनदारांनाही मानसिक त्रास दिला जात आहे; परंतु अनेकजण भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार देत नाहीत. कर्जदारांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी तक्रार देण्याचे आवाहन केल्यानंतर तिघांनी सहकार उपनिबंधक आणि पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर तिघांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतरही बडे सावकार अजूनही खुलेआम नागरिकांची पिळवणूक करत आहेत. चिपळूणमधून सावकारांनी जिल्ह्यात आपले जाळे पसरवले आहे. कर्ज देणे आणि हप्ते वसुलीसाठी त्यांनी जिल्ह्यात माणसे नेमली आहेत; मात्र नागरिक तक्रार देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे.
------------------------
कोट
नागरिकांनी बेकायदा सावकारांविरूद्ध निर्भिडपणे पोलिसांकडे फिर्याद द्यावी; परंतु काहीजण भीतीपोटी तक्रार देत नाहीत. अशा वेळी कर्जदाराने निनावी अर्ज दिला तरी पोलिस त्या सावकाराची चौकशी करतील. त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर करून शहरातील बेकायदा सावकारीचे समूळ उच्चाटन केले जाईल.

- धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT