कोकण

-रिफायनरीच्या माती परीक्षणाचा अहवालाची प्रतीक्षाच

CD

१२ (पान ३ साठी)

माती परीक्षणाचा अहवालाची प्रतीक्षाच

संदीप आहेर ; रिफायनरीचे ड्रोन सर्व्हेक्षण पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी ड्रोन सर्व्हेक्षण व माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागा निश्चित करणे ही बाब धोरणात्मक असून त्याचा निर्णय शासनस्तरावर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या भू संपादन विभागाचे महाव्यवस्थापक संदीप आहेर यांनी दिली.
बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ धोपेश्वर बारसू गोवळ दशक्रोशी रिफायनरी समर्थन समितीने १६ डिसेंबर २०२३ ला मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. यामध्ये रिफायनरी प्रकल्पासाठी ग्रामस्थांची व जमीन मालकांची सहमती असल्याचे स्पष्ट केले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाकडून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या भू संपादन विभागाचे महाव्यवस्थापक संदीप आहेर यांनी या प्रकल्पाच्या भू संपादनाबाबत असलेली व रिफायनरी प्रकल्पाची सद्य:स्थिती पत्राने कळविली आहे. तालुक्यातील बारसू, सोलगाव, वरचीवाडी (गोवळ), खालचीवाडी (गोवळ) येथील जमीन प्रस्तावित आहे. रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल कंपनी, जिल्हाधिकारी आणि अधिकारी यांनी गावांच्या ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन प्रकल्प पर्यावरण पूरक असून त्यापासून ग्रामस्थांना व जमिन मालकांना फायदा होणार आहे, याबाबत चर्चा केली आहे. प्रस्तावित हरित रिफायनरी प्रकल्पाच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे कामकाज (ड्रोन सर्व्हे व माती परीक्षण) रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकलतर्फे शेतकऱ्यांकडून संमत्तीपत्र घेऊन महामंडळाच्या सहकार्याने मे २०२३ मध्ये काम पूर्ण करण्यात आले. मात्र या प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल अद्याप प्राप्त नसल्याचे आहेर यांनी पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT