कोकण

पर्ससीनवर कारवाई करताना मालक बोट घेऊन पसार

CD

पर्ससीनवर कारवाई करताना
मालक बोट घेऊन पसार

मालवणप्रकरणी पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : मत्स्य व्यवसाय विभागाकडून पर्ससीन बोट अवरुद्ध करण्याची नोटीस देण्याची कारवाई सुरू असताना बोटमालक रुजारिओ पास्कॉल पिंटो (रा. दांडी मालवण) व नौकेवरील चार ते पाच कामगार बोट घेऊन पसार झाल्याने त्यांच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद सहायक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी पोलिसांत दिली.
करंगुटकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ५ जानेवारीला रुजारिओ पिंटो यांची पर्ससीन नौका ‘मारिया’ ही १ जानेवारीपासून महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी बंदी असताना मकरेबाग मासळी उतरविण्याच्या केंद्रावर मासळी उतरवत असल्याची तोंडी तक्रार स्थानिक मच्छीमार मिथुन मालंडकर यांनी केली होती. त्यानंतर पोलिस ठाण्याचे पोलिस विक्रम पाटोळे, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक दीपेश मायबा यांच्यासोबत आपण मकरेबाग येथे मासळी उतरविण्याच्या केंद्रावर दुपारी १२.४५ वाजता गेलो. यावेळी नौका मालक रुजारिओ पिंटो हे त्यांच्या मालकीची मारिया नौका मकरेबाग समुद्रात समुद्रकिनारी नांगरून ठेवलेल्या नौकेतील मासे लहान डिंगीतून मासळी किनाऱ्यावर आणून उतरवत असल्याचे दिसून आले. यामुळे मत्स्य विभागाकडून नोटीस देण्याची कार्यवाही सुरू असताना बोट पळविण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास टेंबूलकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT