कोकण

‘सिंधुरत्न’ अंतर्गत प्राप्त निधी जिल्हा बँकेमार्फत द्यावा

CD

56310
सिंधुदुर्गनगरी ः शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत करताना मनीष दळवी व अन्य पदाधिकारी.

‘सिंधुरत्न’ अंतर्गत प्राप्त निधी
जिल्हा बँकेमार्फत द्यावा

मनीष दळवी ः मंत्री दीपक केसरकरांना साकडे

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी ः सिंधुरत्न समृद्धी योजनेअंतर्गत प्राप्त निधी जिल्हा बँकेमार्फत वितरित करावा, अशी मागणी जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.
येथील पत्रकार दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आलेल्या शिक्षणमंत्री केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. मंत्री केसरकर यांनी दळवी यांच्याशी जिल्ह्यातील सहकार चळवळ व सहकार विकासाबाबत चर्चा केली. शासनाच्या नावीन्यपूर्ण सिंधुरत्न योजनेत नोडल एजन्सी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला संधी द्यावी, अशी मागणीही दळवी यांनी केली. केंद्राचा उद्योग विभाग एम.एस.एम.ई., राज्याच्या विविध कर्ज योजनेत नोडल एजन्सी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक काम करत असून, त्याप्रमाणे सिंधुरत्न योजनेतही जिल्हा बँकेला काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली. यावेळी जिल्हा बॅंक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, विठ्ठल देसाई, विद्याधर परब उपस्थित होते.
सिंधुरत्न योजनेंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ३०० कोटींचा निधी पुढील तीन वर्षांत येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करावी. शासन निर्णयानुसार शासन निधीची रक्कम काही निवडक बँकांमार्फत ठेवण्यास मान्यता दिली असून, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश आहे. सिंधुरत्न समृद्धी योजनेअंतर्गत प्राप्त निधी जिल्हा बँकेकडे वर्ग करावा, अशी मागणी दळवी यांनी मंत्री केसरकरांकडे केली.
---
बँकेला सहकार्य करू ः केसरकर
यावेळी मंत्री केसरकर यांनी जिल्हा बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांचे कामकाज व प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. यापुढेही जिल्हा बँकेला पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT