कोकण

पत्रकारितेत समाजभान आवश्यक

CD

56318
पोंभुर्ले ः येथील दर्पण सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. अजित गोगटे, रवींद्र बेडकिहाळ उपस्थित होते. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

पत्रकारितेत समाजभान आवश्यक

पालकमंत्री रवींद्र चव्हाण ः पोंभुर्लेत ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ ः पुरस्कार मिळणे म्हणजे एक जबाबदारी असते. त्याकाळी प्रतिकुल परिस्थितीत पत्रकारिता करणे सोपे नव्हते. समाजाचे भान ठेवून पत्रकारिता व्हायला हवी. पारदर्शकता हा बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा गाभा होता. त्यामुळे बाळशास्त्रींना अपेक्षित पत्रकारिता हवी, असे मत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पोंभुर्ले (ता. देवगड) येथे व्यक्त केले.
फलटण (सातारा) येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे आज पोंभुर्ले येथील दर्पण सभागृहात ‘पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला, त्यावेळी पालकमंत्री चव्हाण बोलत होते. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणाऱ्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. यंदा पुरस्कारांचे ३१ वे वर्ष होते. मंचावर माजी आमदार अॅड. अजित गोगटे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मराठवाडा विभाग साहित्य परिषद, नांदेडचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, सुधाकर जांभेकर आदी उपस्थित होते. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पालकमंत्री चव्हाण यांनी, समाजाचे भान ठेवून पत्रकारिता व्हायला हवी. समाज प्रबोधनासाठी पत्रकारिता हवी. सामान्य माणूस, वाचक यांच्यासाठी वृत्तपत्रात स्थान द्या, असे आवाहन केले. प्रास्ताविक करताना बेडकिहाळ यांनी पोंभुर्ले येथील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या उभारणीचा प्रवास कथन केला. वेळोवेळी झालेल्या स्थित्यंतराची मांडणी केली. बाळशास्त्रींच्या पुण्याईतून उतराई होण्यासाठी राज्यभरातील पत्रकारांना संस्थेतर्फे पुरस्कार दिले जात असल्याचे सांगून बाळशास्त्रींच्या विचारांची पालखी पुढे नेण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. अमर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, परिविक्षाधीन तहसीलदार विशाल खत्री, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे बासुदकर, कृष्णा शेवडीकर, अलका बेडकिहाळ, शांताराम गुरव, संतोष किंजवडेकर आदी उपस्थित होते.
.....................
चौकट
पुरस्कारांचे मानकरी
‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार माधव कदम (सिंधुदुर्ग), राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार प्रशांत कदम (नवी दिल्ली), सागर देशपांडे (पुणे), कैलास म्हापदी (ठाणे), श्रीकांत कात्रे (सातारा), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार-कृतिका पालव (मुंबई), साहित्यिक गौरव पुरस्कार-भगवान अंजनीकर (नांदेड), विशेष ‘दर्पण’ पुरस्कार-शशिकांत सोनवलकर (दुधेबावी, ता. फलटण), विक्रम चोरमले (फलटण) यांना देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ohh No! भारतीय गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; असं नेमके काय घडले?

मनीष मल्होत्रांच्या रॅम्पवर सेलिब्रिटींचा जलवा! सगळीकडे आलियाच्या साडीची चर्चा, लूक पाहून चाहते घायाळ

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT