Cervical Cancer esakal
कोकण

Cervical Cancer : वेळीच काळजी घेतल्यास टाळता येतो गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, काय सांगतात डॉक्टर ?

महिलांमध्ये वाढतोय गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग

CD

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे सर्व्हिक्स किंवा ग्रीवा. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. स्त्रीयांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. ह्युमन पॅपिलोमाव्हायरसचे अनेक स्ट्रेन असतात. यातील काही स्ट्रेन घातक आहेत. याचा संसर्ग झाल्यास गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते, असे मत डॉ. तेजल गोरासिया ब्रेस्ट अँड स्त्रीरोगतज्ञ, ऑन्को लाईफ केअर सेंटर यांनी व्यक्त केले.

डॉ. तेजल म्हणाल्या, ह्युमन पॅपिलोमाव्हायरसचा संसर्ग झालेल्या प्रत्येकालाच कॅन्सर होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनाच त्रास होण्याची शक्यता असते. नियमित तपासणी आणि पॅप स्मीअर चाचणी केल्याने वेळीच प्रतिबंध करता येऊ शकते. अनेक स्त्रिया त्यांच्या एचपीव्ही स्थितीबद्दल अनभिज्ञ असू शकतात. नियमित तपासणीबाबत जागरुक नसतात. नियमित पॅप स्मीअर आणि एचपीव्ही लसीकरणाने या कर्करोगास प्रतिबंध करणे शक्य आहे. २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्येही आता गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान केले जात आहे. असुरक्षित लैंगिक संभोग हे यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपैकी एक आहे.

अनेक तरुण स्त्रियांना एचपीव्हीसाठी नियमित तपासणी किंवा लसीकरणाची आवश्यकता भासत नाही. ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणात योनीद्वारे होणारा रक्तस्त्राव, जसे की मासिक पाळी दरम्यान, रजोनिवृत्तीनंतर किंवा लैंगिक संभोगानंतर होणारा रक्तस्त्राव अशी आहेत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. स्त्रियांना त्यांच्या योनीतून स्त्रावामध्ये काही बदल दिसल्यास, त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या इतर चिन्हांमध्ये ओटीपोटात वेदनाचा समावेश आहे. ही वेदना ओटीपोटात किंवा पाठी खालच्या भागात होऊ शकते आणि मासिक पाळीच्या वेदनेपेक्षा वेगळी असू शकते. महिलांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे तेजल यानी सांगितले.

एच. पी. व्ही. लसीकरण

९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींकरिता दोन डोस दिले पाहिजेत, ०-६ महिन्याच्या अंतराने दिले पाहिजेत. १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील मुलींकरिता तीन डोस दिले पाहिजेत, ०-१-६ महिन्याच्या अंतराने दिले पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT