कोकण

अंधश्रद्धा, जादूटोणा कायदा धर्माविरोधात नाही

CD

rat6p29.jpg
63181
माळनाकाः येथे संत साहित्य संमेलनात अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर मार्गदर्शन करताना सामाजिक न्याय मंत्रालयाचे सहसचिव दिनेश डिंगळे.

----------
अखिल भारतीय मराठी संत साहित्य समेलन--लोगो

अंधश्रद्धा, जादूटोणा कायदा धर्माविरोधात नाही
दिनेश डिंगळे; अनिष्ट प्रथेला विरोध, जनजागृतीची गरज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ः आजची तरुण पिढी भौतिक सुखाच्यामागे लागली असून, व्यसनाच्या आहारी जात आहेत. शौक म्हणून ड्रगचाही वापर होत आहे. भरकटलेल्या पिढीला जनजागृतीच्या माध्यमातून जवळ आणणे पर्याप्त झाले आहे. अंधश्रद्धा, जादूटोणा यासाठीचा कायदा कोणत्याही धार्मिक कार्याच्या आड येत नाही. तो कायदा समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्रालयाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सुरू आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर ते बोलत होते. या वेळी अध्यक्ष गुरूबाबा महाराज औसेकर, वक्ते विठ्ठल पाटील (काकाजी), पांडुरंग महाराज राशिणकर, तुकाराम महाराज ठाकूर बुवा (दैठणकर), विशेष अधिकारी, सामाजिक न्यायमंत्री भारत सरकारचे प्रवीण मोरे आदींसह वारकरी संप्रदायाचे प्रमुख उपस्थित होते.
डिंगळे म्हणाले, जादूटोणा हा कायदा धर्माच्या विरोधात नाही. धार्मिक विधी, प्रदक्षिणा, वारकरी संप्रदाय, भजन, कीर्तन प्रवचन अथवा श्रद्धा आणि उपासना यांच्या आड येत नाही तसेच प्रार्थनास्थळे, मंदिरे, उपासना केंद्र यालाही विरोध करत नाही. केवळ बुवाबाजी, जादूटोणा सारख्या अनिष्ट प्रथेला हा कायदा विरोध करतो. या प्रथेच्या अधीन जाणाऱ्यांनी विज्ञानाची कास धरावी. संत वाङ्मयाचा अभ्यास करावा जेणेकरून अंधश्रद्धेला बळी पडणार नाहीत. संत साहित्यातून अनेकांनी प्रगती साधली आहे. मुलांनीही इंटरनेटचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा.

चौकट
संस्कृती जपण्याचे काम वारकऱ्यांकडून
मराठी संत साहित्यामध्ये संतांनी शेती, प्रशासन, आर्थिक व्यवहार, सहकार, पर्यावरण, नारीशक्ती, सामाजिक विषमता, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती या मानवी जीवनाशी निगडित विविध विषयावर भाष्य केले आहे. संताचे साहित्य संपूर्ण विश्वाला दिशा देणारे असून जातीभेद नष्ट करणे, संत साहित्याची परंपरा पुढे सुरू ठेवणे, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम वारकऱ्यांकडून होत असल्याचे श्रीकांत महाराज ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT