Nilesh Rane-Bhaskar Jadhav dispute MP Vinayak Raut esakal
कोकण

Vinayak Raut : ..तर आम्ही हजारोंच्या संख्येने पोलिस ठाण्यात अटक करून घेऊ, खासदार राऊतांचा इशारा

नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी चिपळूण येथे येऊन त्यांच्या गुंडांच्या साथीने आमदार भास्कर जाधव यांचे कार्यालय व कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता.

सकाळ डिजिटल टीम

नीलेश राणे यांच्या ज्या लोकांनी पोलिसांच्या हातातील काठ्या हिसकावून घेतल्या आणि पोलिसांच्या आणि तिथल्या लोकांच्या वाहनांची तोडफोड केली, त्या गुंडांना अद्यापही पकडण्यात आलेले नाही.

रत्नागिरी : चिपळूण येथे नीलेश राणे (Nilesh Rane) व भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नुकत्याच झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना अटक करण्याचे सत्र सुरू केले आहे. पोलिसांची ही एकतर्फी कारवाई सुरू आहे. याबाबत अपर पोलिस अधीक्षकांना भेटून वस्तुस्थिती सांगितली. जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर जरूर कारवाई करा, पण अट्टल गुन्हेगारांना सोडायचे आणि निरपराध नागरिकांना पकडायचे, असे जर पोलिसांनी चालू ठेवले, तर आम्ही हजारोंच्या संख्येने पोलिस ठाण्यात अटक करून घेऊ, असा इशारा उबाठाचे नेते, खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिला.

रत्नागिरी येथे कार्यक्रमानिमित्त आलेले खासदार राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘नुकतेच भाजपचे तथाकथित नेते माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी चिपळूण येथे येऊन त्यांच्या गुंडांच्या साथीने आमदार भास्कर जाधव यांचे कार्यालय व कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. त्यांनी आपल्या हिडीसपणाचे दर्शन घडवले होते. त्या प्रकरणी दबावाखाली पोलिसांनी एकतर्फी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करायला सुरुवात केलेली आहे.

नीलेश राणे यांच्या ज्या लोकांनी पोलिसांच्या हातातील काठ्या हिसकावून घेतल्या आणि पोलिसांच्या आणि तिथल्या लोकांच्या वाहनांची तोडफोड केली, त्या गुंडांना अद्यापही पकडण्यात आलेले नाही. पोलिसांची या प्रकरणी एकतर्फी कारवाई सुरू आहे. मी येथील अपर पोलिस अधीक्षकांना भेटून यासंबंधीची वस्तुस्थिती त्यांना सांगितलेली आहे.’ जे गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जरूर कारवाई करा; पण अट्टल गुन्हेगारांना सोडून निरपधार नागरिकांना पकडू नका, असेही त्यांना सांगितले आहे.

अट्टल गुन्हेगारांना अटक करा

अट्टल गुन्हेगारांना सोडायचे आणि निरपराध नागरिकांना पकडायचे, असे जर पोलिसांनी सुरू केले आहे, तर हे चुकीचे असून, काही दिवसांमध्ये पोलिसांना आम्ही हजारोंच्या संख्येने पोलिस ठाण्यामध्ये दाखल होऊन अटक करायची मागणी करू, असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT