Dapoli Temperature esakal
कोकण

Dapoli Temperature : दापोली तालुक्यात भरली हुडहुडी, तापमान 9.4 अंशावर; आंबा, काजू कलमांवर परिणाम

गेले महिनाभर तापमानात चढउतार सुरू असल्याने त्याचा परिणाम आंबा, काजू कलमांवर होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात साधारणपणे ऑक्टोबरअखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीसच जिल्ह्यात थंडीला प्रारंभ होतो. यंदा नोव्हेंबरमध्ये एक-दोन दिवसच थंडीची चाहूल लागली.

हर्णै : दापोलीचा (Dapoli Temperature) पारा तिसऱ्यांदा खाली आला. आजच्या २४ तारखेला किमान तापमान ९.४ अं.से. अशी नोंद झाली आहे. यापूर्वी १६ जानेवारीला एवढेच तापमान होते. आता पुन्हा थंडीची लाट (Cold Snap) आली असून, तालुक्यामध्ये हुडहुडी भरली आहे.

कोकण कृषी विद्यापिठाच्या (Konkan Agricultural University) कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर पुन्हा किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअ अशी नोंद २४ फेब्रुवारीला झाली आहे. राज्यात साधारणपणे ऑक्टोबरअखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीसच जिल्ह्यात थंडीला प्रारंभ होतो. यंदा नोव्हेंबरमध्ये एक-दोन दिवसच थंडीची चाहूल लागली. मात्र त्यानंतर थंडी गायबच झाली होती.

तापमान घसरल्याने तालुक्यात दिवसभर गारठा होता. गेले महिनाभर तापमानात चढउतार सुरू असल्याने त्याचा परिणाम आंबा, काजू कलमांवर होत आहे. मधेच दव पडत असल्याने आंबा आणि काजू कलमांना आलेल्या मोहोरावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत पडले आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे समुद्र किनाऱ्यावर सीगल पक्ष्यांचे आगमन झाले असून, थव्याने उडणारे हे पक्षी पाहण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, जयंत पाटलांविरोधात फुकले रणशिंग

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT