कोकण

कासव संवर्धनात गुहागर राज्यात अव्वल

CD

rat3p22.jpg
68837
गुहागर किनाऱ्यावरील हॅचरी
rat3p23.jpg
68838
किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेले कासव.
------------
कासव संवर्धनात गुहागर राज्यात अव्वल
२३ हजार १९८ अंड्यांचे संवर्धन ; महिन्यात १३१८ कासवं झेपावली
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ३ः मागील वर्षीच्या तुलनेत गुहागर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर तीन ठिकाणी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांनी तयार केलेल्या घरट्यांची संख्या, दिलेली अंडी व जन्माला आलेली पिल्ले या आकडेवारीवरून यंदा गुहागरला कासवांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये गुहागरने कासव संवर्धनात अव्वल स्थान पटकावले आहे, असे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी सांगितले.
भारताला लाभलेल्या आठ हजार किमी सागरी किनारपट्टीवर कासवांच्या चार प्रजाती आढळतात. त्यापैकी ऑलिव्ह रिडले ही एक आहे. मादी कासव रात्री किनाऱ्यावर वाळूत खड्डा तयार करून एकाचवेळी अंडी घालते व समुद्रात निघून जाते. मादीने अंडी घातल्यानंतर त्यामधून पिल्लू बाहेर येईपर्यंत भटकी कुत्री, लांडगे, कोल्हे, शिकारी पक्षी यांच्यापासून धोका असतो. या कालावधीत ती असुरक्षित असल्याने त्यांचे संरक्षण व संवर्धन वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, कांदवळन कक्ष, कासवमित्र यांच्याकडून केले जात आहे. यंदा हंगामात गुहागर बाग व गुहागर बरचापाट येथील समुद्रकिनारी १६ डिसेंबर २०२३ रोजी पहिले घरटे आढळले. पुढे आजपर्यंत २२३ घरटी व त्यामध्ये २३ हजार १९८ अंडी सापडली. ही अंडी मिळालेल्या तारखेनुसार हॅचरीमध्ये सुरक्षित केली आहेत. १ मार्चला ३२१ कासवांची पिल्ले बाहेर पडली. आजपर्यंत १३१८ अंड्यांतून कासवाची पिल्ले समुद्रात विसावली आहेत. विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर यांच्या नियंत्रणाखाली कासवांची अंडी संरक्षित करण्यासाठी वनपाल संतोष परिशेट्टे, वनरक्षक अरविंद मांडवकर व कासव मित्र यांनी केलेली मदत यामुळे महाराष्ट्रात कासव संरक्षण व संवर्धनात अव्वल स्थान मिळवले आहे.

चौकट
अंडी व पिल्लांची नोंद अॅपवर
जिल्ह्यातील विविध किनारे कासवांनी मोठ्याप्रमाणावर अंडी घालण्यासाठी निवडणे, हे तेथील स्थानिकांच्या मेहनतीचे फळ आहे. कासव संवर्धनाला अधुनिक पध्दतीची जोड देण्यात आली असून कासवाच्या घरट्यांच्या नोंदी, घरट्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांची संख्या आदी नोंदी एम. टर्टल अॅपमध्ये घेण्यात येत आहेत. कासवांच्या अंड्यांचे तंत्रशुद्धपणे व प्रभावीपणे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी हंगामाच्या सुरवातीला कांदळवन कक्ष व वन विभागामार्फत कार्यशाळा घेतली जाते.
---
चौकट 2
अशी सोडली पिल्ले....
हॅचरी घरटी अंडी सोडलेली पिल्लं
गुहागर बाग ६० ६१३१ ९५६
गुहागर वरचापाठ १३९ १४४२७ २३१
तवसाळ २४ २६४० १३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Alert: सोन्याचे भाव पुन्हा कोसळणार? वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात धक्कादायक संकेत

कॅबिनेटमध्ये मोदी इन्स्टाग्रामवर लक्ष द्यायला सांगतात, राजीनाम्यानंतर प्रधानांचं स्वागत; हेच का पेपरफुटीवर गांभीर्य? गोगोईंचा सवाल

Bank Holidays: ग्राहकांनो, लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँकांना सुट्ट्या; RBI ने जाहीर केलेल्या 'या' तारखा नीट लक्षात ठेवा

'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मकरंद अनासपुरेंची धमाकेदार एन्ट्री; एकाच संवादात गुंफली १५ चित्रपटांची नावं

Grocery Price Hike: सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, रोजच्या आयुष्यातील 'या' गोष्टी महाग; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT