कोकण

दैवदुर्लभ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप उभा

CD

rat3p24.jpg-
68839
रत्नागिरी : भाजप कार्यकर्ता संमेलनात बोलताना बाळासाहेब माने. सोबत डॉ. प्रमोद सावंत व पदाधिकारी. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
---------

दैवदुर्लभ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप उभा
बाळ माने; सावरकर नाट्यगृहात पक्षाच्या कार्यकर्तांचे संमेलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : भाजपचे लोकसभा प्रमुख व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दापोलीचा दौरा केल्यानंतर ते उमेदवारांच्या यादीसाठी दिल्लीत रवाना झाले. तेव्हा माझ्या काही मित्रांचा गैरसमज झाला की बहुतेक रत्नागिरी मतदारसंघांमध्ये डॉ. सावंत येत नाहीत. परंतु अजून भारतीय जनता पक्ष म्हणजे काय, ते काय करतात हे काहींना माहिती नाही. आमचा मूल्यांचा पक्ष आहे. राष्ट्र प्रथम या उक्तीनुसार आम्ही काम करतो. सत्तेचे पद मिळावे, लाभ मिळावा यासाठी कार्यकर्ता काम करत नाही. ही जागा भाजपच कमळाच्या निशाणीवर लढवणार आहे, असे प्रतिपादन लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांनी केले.
सावरकर नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. ते म्हणाले, १९७७ मध्ये खासदार म्हणून या जनतेने अॅड. बापूसाहेब परुळेकर यांना विजयी केले होते. जनसंघाच्या माध्यमातून गुहागरचे आमदार डॉ. तात्यासाहेब नातू विजयी झाले. रत्नागिरीच्या पहिल्या महिला आमदार कुसुमताई अभ्यंकर यांच्या माध्यमातून भाजपने नारींचा सन्मान केला आहे. या सर्वांचा राजकीय वारसदार म्हणून जनतेने मला निवडून दिलं होतं. परंतु २००९ आणि १४ मध्येही फसवणूक करून पाडले. आम्ही आजवर सतत संघर्ष केला. परंतु हे देवदुर्लभ असणारे कार्यकर्ते, बुथप्रमुख, सुपर वॉरियर्स हे कुठल्याही योनजेचे लाभार्थी नाहीत. परंतु ते आपल्यासोबत आहेत. या वेळी डॉ. प्रमोद सावंत, बाळासाहेब पाटील, अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अॅड. बाबा परुळेकर, सुजाता साळवी, शिल्पा मराठे, प्रमोद अधटराव, राजश्री विश्वासराव उपस्थित होते.

चौकट
रिफायनरी व्हायला हवी - प्रमोद जठार
लोकसभा संयोजक प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर तोंडसुख घेतलं. ते म्हणाले की, आमचा हक्काचा खासदार नसल्याने आमच्या दोन हजार गावातल्या सगळ्या मंडळींना न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे आता आम्हाला कमळाचा खासदार पाहिजे. तीन लाख कोटी रुपयांची रिफायनरी व्हायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT