68890
सिंधुदुर्गनगरी ः पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते बालकाला पोलिओ डोस देण्यात आला. शेजारी जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे.
३४,९०१ बालकांना पोलिओ डोस
जिल्ह्यात ९०७ केंद्रांवर मोहीम ः उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधान
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पाच वर्षांखालील मिळून एकूण ३४ हजार ९०१ बालकांना ही लस देण्यात आली. यासाठी एकूण ९०७ लसीकरण केंद्र तयार करण्यात आली होती. याचा जिल्हास्तरावर प्रारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते एका बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांचा या मोहिमेला उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने जिल्हाधिकारी तावडे यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. सई धुरी यांनी पल्स पोलिओबाबत यावेळी विस्तृत माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध माध्यमांद्वारे आरोग्य विषयक जनजागृती केली जात आहे. येथील नागरिकही शासनाच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी असतात, ही एक सकारात्मक बाब आहे. पल्स पोलिओ उपक्रमातही जिल्ह्यातील मातांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.’’ दरम्यान, एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानके, यात्रा ठिकाणी, विमानतळ, टोलनाके, मजूर वस्त्या आदी ठिकाणी ४० मोबाईल पथके कार्यरत आहेत, अशी माहिती डॉ. धुरी यांनी दिली.
---
२ लाख ५ हजार २४ घरांना भेटी
डॉ. धुरी म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात २०२२ मध्ये पल्स पोलिओ मोहीम राबविली होती. त्यानंतर आज ही मोहीम होत आहे. या मोहिमेत आरोग्य विभागाची ९०९ पथके कार्यरत होती.आहेत. जिल्ह्यात २ लाख ५ हजार २४ एवढ्या घरांना भेट देऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते पाच या वेळेत हे लसीकरण होत आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.