

live update
esakal
आम्ही पैसे दिले की महिला शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गर्दी करतात, महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला विचारतात पैसे कधी टाकणार आहात. अस खिल्ली उडवणार वक्तव्य खुद्द महिला व बालविकासच्या मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या मदतीवरून वाशिम इथ केलय. वाशिम येथील महिला व बालविकास विभागाच्या अहिल्या भवनच्या लोकार्पण सोहळ्या निमित्य आयोजित संवाद कार्यक्रमात तटकरे बोलत होत्या. आदिती तटकरे यांच्या या वक्ताव्यानंतर आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे.