कोकण

माय माऊली तुझी कृपा सदा आम्हावरी राहु दे

CD

68916
68917
आंगणेवाडी ः भराडी मातेच्या यात्रेत शनिवारी रात्री ताटे लावण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यात सुहासिनी डोक्यावर ताटे घेऊन मंदिरात प्रवेश करत होत्या. दुसऱ्या छायाचित्रात मध्यरात्री भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले.


माय माऊली तुझी कृपा सदा आम्हावरी राहु दे!

आंगणेवाडीत भक्तांचे साकडे ः मोड यात्रेने वार्षिकोत्सवाची सांगता

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडीतील श्री आई भराडी देवीचा यात्रोत्सव भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात झाला. यात्रोत्सवात काल (ता.२) ९ वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत ताटे लावण्याच्या कार्यक्रमापर्यंत भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. भक्तांना उत्कंठा लागून असलेला प्रसाद वाटपाचा क्षण विस्मरणीय ठरला. यावर्षीच्या यात्रा काळात दोन दिवसात लाखो भाविकांनी भराडी देवीच्या चरणी नतमस्तक होत नवस फेडून, माय माऊली तुझी कृपा सदा आम्हावरी राहु दे, असे साकडे घातले. आजच्या दुसऱ्या दिवशी मोड यात्रेने वार्षिकोत्सवाची सांगता झाली.
यात्रोत्सवानिमित्त व्यापारी वर्गाची लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले. यात्रेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी आंगणेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने उशिरापर्यंत भक्तांची गर्दी कायम होती. आज आंगणे कुटूंबियांनी देवीचे दर्शन घेत ओट्या भरल्या. त्यानंतर सायंकाळी उशिरा यात्रेची सांगता झाली. काल सायंकाळी सूर्य मावळत्या दिशेने सरकत होता तसतशी यात्रोत्सवात रात्री भक्तांच्या गर्दीचा उच्चांक वाढत होता. आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवामध्ये मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई, लेझर किरणाचे दूरवर पडणारे प्रकाश झोत साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाईने आंगणेवाडी परिसर उजळून निघाला होता. मंदिराच्या विद्युत रोषणाईसह आपल्या मोबाईलवर सेल्फी टिपताना युवावर्ग दिसून येत होता. मंदिर परिसरात भव्य सभामंडप, चल चित्र देखावा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. गजबजलेली खाजा-मिठाईची दुकाने याबरोबरच आकाश पाळणा, मौत का कुव्वा इतर फनी गेम्स याठिकाणी युवा वर्ग चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.
रात्री १० वाजण्याच्या सुमारास देवीला प्रसाद (ताटे) लावण्याच्या धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथम देवीच्या मानकऱ्यांची प्रसादाची ताटे देवीच्या प्रांगणात सुहासिनी महिलांनी डोईवर घेत आणली. यानंतर ग्रामस्थांनी घरात बनविलेली प्रसादाची ताटे देवालयात आणण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भक्तांची एकच गर्दी झाली होती. ''''जय..जय भरडी देवी..''''जय...जय.. भरडी देवी...या मंत्र घोषात भक्त तल्लीन झाले होते. महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर दरवर्षीप्रमाणे अनेक भाविकांनी आंगणे कुटूंबियांच्या घरी प्रसाद घेतला. यावेळी भक्तांना देवीच्या दर्शनाची रांग दीड वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती. यानंतर पुन्हा दर्शन रांग सुरु करण्यात आली. आज सायंकाळी उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी आपली हजेरी लावत होते.
यात्रेत भक्तांच्या गर्दीचा उच्चांक पाहता यात्रोत्सवात सहभागी झालेल्या व्यापारी बांधवांची चांगली आर्थिक उलाढाल झाली. व्यावसायिकांच्या वस्तूंची चांगली विक्री झाली. कपडे, चादर, खेळणी, शेती उपयोगी अवजारे, मिठाई दुकानदार, खाद्यपदार्थ, हॉटेल व्यावसायिक, विविध स्टॉलधारक यांचा व्यवसाय तेजीत होता. यात्रेत भराडी देवीच्या यात्रेस येणाऱ्या राज्यातील लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ महिनाभर नियोजनात व्यस्त असतात. त्यामुळे प्रथम पाहुण्याचे आदरातिथ्य नंतर कौटुंबिक सोहळा अशा प्रथेमुळे आज मोड यात्रेच्या दिवशी मुंबई, पुणे यासह अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेल्या आंगणे कुटुंबियांनी व स्थानिक आंगणेवाडीवासियांनी रांगेत उभे राहून श्री देवी भराडी देवीचे दर्शन घेतले. यात्रा यशस्वितेसाठी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत प्रशासन तसेच पोलिस प्रशासन, महसुल विभाग, आरोग्य प्रशासन, महावितरण, एसटी प्रशासन, आंगणे कुटुबिय मुंबई मंडळ, उत्सव समिती तसेच आंगणे परिवाराने परिश्रम घेतले. यावेळी आंगणेवडीत दाखल झालेल्या भाविकांनी देवीच्या दर्शनानंतर आंगणे कुटुंबियांच्या सुनियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. यात्रोत्सवास आलेले भाविक कोणत्याही आंगणेवाडी ग्रामस्थांकडून देण्यात आलेल्या सेवांपासून वंचित न राहिल्याने तसेच कुठेही गालबोट न लागता यात्रोत्सव पार पडल्याने ग्रामस्थांनी भाविकांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
---------------
चौकट
सुयोग्य नियोजन
भक्तांना सुलभ देवीचे दर्शन व्हावे, यासाठी नऊ रांगाचे सुनियोजन आंगणेवाडी ग्रामस्थांनी केल्याने भाविकांना भराडी मातेचे सुलभ दर्शन होत होते. आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ मंडळ तसेच प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे यावर्षीचा भराडी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरळीत पार पडला. सायंकाळी विविध राजकीय पदाधिकारी नेते मंडळी भेटी देत भराडी देवीचे दर्शन घेतले. देवीच्या दर्शनासाठी आज उशिरा सायंकाळपर्यंत भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
---------------
चौकट
स्वच्छता मोहीम राबविणार
आंगणेवाडी यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांकडून तसेच व्यापाऱ्यांकडून सहाजिकच मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये यासाठी प्रशासन, परिसरातील शाळा व कॉलेजच्या मुलांकडून तसेच ग्रामस्थांकडून आंगणेवाडी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. इच्छुक शाळांनी मंडळाचे कार्याध्यक्ष बाळा आंगणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल होणार? उच्चस्तरीय टास्क फोर्सची स्थापना; PM मोदींची मोठी घोषणा

Madha Vitthal Temple : परतीच्या वारीत माढ्यातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी; दर्शनासाठी रांगा

Career Katta Paliwala College : पालीवाला महाविद्यालयात करिअर संसद शपथविधी उत्साहात; विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला नवी दिशा

IND vs ZIM: पहिलाच बॉल अन् वैभव सूर्यवंशीचा भारी झेल, गोलंदाज मयंक यादवची भुवनेश्वर कुमारच्या रेकॉर्डशी बरोबरी; पाहा Video

Tata Products: महागाईचा आणखी एक झटका! टाटा चहा, मीठ, डाळींचे दर वाढवणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

SCROLL FOR NEXT