कोकण

सहेलीतर्फे ध्यानधारणा

CD

सहेलीतर्फे ध्यानधारणा
रत्नागिरी : जायन्ट्स ग्रुप ऑफ कुवारबाव सहेली या ग्रुपच्यावतीने गावखडी येथे महिलांसाठी ध्यानधारणा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये डॉक्टर महिलाही आवर्जून उपस्थित होत्या. आताच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच ध्यानाची खूप गरज आहे. म्हणूनच स्मिता अकोजवार आणि श्रीमती नाईक या प्रशिक्षिकांनी ध्यानधारणा कशी करावी, हे शिकवले. या वेळी ग्रुपच्या वंदना प्रभू, माधुरी केळकर, सुवर्णा चव्हाण आणि आणि अनुया बाम उपस्थित होत्या. गावखडी येथील वृंदा बर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
-----
टायनी टॉट्सतर्फे महिला दिन
रत्नागिरीः नवनिर्माण शिक्षणसंस्था संचलित टायनी टॉट्स या पूर्व प्राथमिक विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त माता पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हाय. शाळेच्या मुख्याध्यापिका नजमा मुजावर उपस्थित होत्या. पाककला, निबंध स्पर्धा, परफेक्ट मॅचिंग, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यात माता पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पाककला स्पर्धेत प्रिया सावंत, स्नेहल मुंगल, उमा जाधव यांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकावले. निबंध स्पर्धेत परी सूर्यवंशी, सबिहा डिंगणकर आणि ऋतुजा गुडेकर यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. परफेक्ट मॅचिंग स्पर्धेत शुभा पालांडे, सायमा पटेल, परी सूर्यवंशी यांनी तर वक्तृत्व स्पर्धेत माधवी कांबळे, सोनू शर्मा आणि सबिहा डिंगणकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. माता पालकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि दैनंदिन कामातून विरंगुळा मिळावा या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

Nashik News : नाशिककरांनो लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त उद्या वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर असेल प्रवेशबंदी

Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

Bank Holiday: उद्या बँकांना सुट्टी? ईदमुळे 21 मार्चला तुमच्या शहरात बँका बंद की सुरू? पाहा RBI ची माहिती

'आमच्याकडे ‘जिन’ आहे, तो सर्व इच्छा पूर्ण करतो' म्हणत तरुणीची फसवणूक, अडीच वर्षांत १६ लाख रुपयांनी घातला गंडा

SCROLL FOR NEXT