कोकण

साखरपा-महामार्ग रुंदीकरणात एसटी प्रवासी उघड्यावर

CD

महामार्ग रुंदीकरणात एसटी प्रवासी उघड्यावर
निवाराशेड जमिनदोस्त; विद्यार्थी, वृद्धांचे हाल, भर उन्हात पाहावी लागते बसची वाट
साखरपा, ता. १०ः मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे कामं जोरदार सुरू आहे; कामामुळे अनेक ठिकाणच्या निवारा शेड जमिनदोस्त झाल्या आहेत तर काही ठिकाणी काम पूर्ण झाले असल्याने त्या ठिकाणी निवारा शेड बांधण्यात आल्या आहेत. तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण धामणी येथे निवारा शेड नसल्याने अनेकांना याचा त्रास होत आहे; शालेय विद्यार्थी ते जेष्ठ नागरिक यांना याचा खूप त्रास होत आहे.
चौपदरीकरणाचे कामं पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने लागतील. परंतु तोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदारांनी वेळीच याची दखल घेऊन येथे प्रवासी निवारा शेड बांधाव्यात, अशी मागणी होत आहे. शासनाच्या आराखड्यात धामणीमध्ये निवारा शेड नसल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. अशीच परिस्थिती रत्नागिरी-नागपूर महामार्गावरही आहे. पाली ते साखरपा दरम्यानचे अनेक बस थांबे उदध्वस्त झाले आहेत. मिऱ्या-नागपूर महामार्गाचे रुंदीकरणाचे काम जोरात सुरू आहे. या कामाच्या पाली ते आंबा घाट या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आहे. या रुंदीकरणात अनेक गावातील एसटी निवारा शेड तोडण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. पाली ते साखरपा दरम्यान चोरवणे फाटा, घाटीवळे, देवळे स्टँड, देवळे फाटा, मेढे इथल्या थांब्यांवर प्रवासी उन्हात ताटकळत असतात. गेले काही दिवस दिवस तापमानात मोठी वाढ झाल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. या उन्हामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दहावी, बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेसाठी गावागावातून परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांनाही या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.

चौकट
बांधकाम मंत्री चव्हाण यांना पत्र
धामणीमधील काही तरुणांनी संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमित ताठरे यांना सांगितले असता ताठरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहिले आणि धामणीमध्ये निवारा शेड उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली. ही मागणी मान्य होऊन विद्यार्थी व नागरिकांना दिलासा मिळेल का हे पाहणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT