कोकण

‘झरा मायेचा, प्रयत्न अमुचा अखंड जपण्याचा’

CD

70272
पणदूर : शिक्षक समिती महिला आघाडीतर्फे संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान करण्यात आल्या.


‘झरा मायेचा, प्रयत्न अमुचा अखंड जपण्याचा’

शिक्षक समितीचा वसा ः महिला आघाडीतर्फे संविता आश्रमास साहित्य

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १० ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘झरा मायेचा, प्रयत्न अमुचा अखंड जपण्याचा’ हा उपक्रम जीवन आनंद संस्थेच्या संविता आश्रम, पणदूर येथे पार पडला. यावेळी महिला आघाडीच्या वतीने जीवनावश्यक वस्तू संस्थेस दानरुपाने सुपूर्द करण्यात आल्या.
‘काल त्या होत्या, म्हणून आम्ही आज पाहिला, कृतार्थ भाव म्हणून थोडासा सेवाभाव वाहिला’, अशा टॅगलाईन खाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब, शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, शिक्षक नेत्या सुरेखा कदम, शिक्षक बँक अध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सल्लागार नितीन कदम, महिला जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर, महिला सरचिटणीस वैभवी कसालकर, राज्य महिला सदस्य नीलम बांदेकर, संचालक चंद्रसेन पाताडे, ऋतुजा जंगले, ‘जीवन आनंद’चे विश्वस्त किसन चौरे, सल्लागार सुगंध तांबे, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश गरुड, वेंगुर्ले अध्यक्ष सीताराम नाईक, सचिव प्रसाद जाधव, संघटक ईश्वरलाल कदम, नीलेश ठाकूर, दिनेश जंगले, सतीश राऊळ, महिला आघाडी जिल्हा कोषाध्यक्ष श्रेया नानचे, जिल्हा प्रवक्ता रश्मी आंगणे, कणकवली महिला तालुकाध्यक्ष नेहा मोरे, कोषाध्यक्ष सारिका पवार, सल्लागार ममता सावंत, सदस्य प्रियजा राऊत, वृषाली पावसकर, सुलक्षणा केंद्रे, महिला जिल्हा कार्यकारिणी सदस्य मेखला कदम, उन्नती कराळे, रेखा वंटे, महिला जिल्हा उपाध्यक्ष रिया सांगेलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष शिल्पा जाधव, अनिता शिर्के, शिल्पा गोठोस्कर, महिला शिक्षक नेत्या प्रतिमा पेडणेकर, वेंगुर्ले महिला शिक्षक नेत्या अनिता रॉड्रिग्ज आदी उपस्थित होते.
यावेळी महिला आघाडीमार्फत सुमारे ४५ हजारांचे जीवनावश्यक साहित्य जीवन आनंद संस्थेस प्रदान करण्यात आले. यापुढेही संस्थेस सहकार्य करण्याचे सूतोवाच संघटना पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी संदीप परब यांनी शिक्षक समितीच्या सामाजिक भावनेतून केलेल्या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. किसन चौरे यांनीही संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी राजन कोरगावकर, विठ्ठल गवस, सुरेखा कदम, नितीन कदम, निकिता ठाकूर यांनी विचार व्यक्त केले. जिल्हा महिला सरचिटणीस वैभवी कसालकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT