कोकण

राजापूर-गावे विकसित करण्याचे अधिकार सिडकोकडे नको

CD

गावे विकसित करण्याचे
अधिकार सिडकोकडे नको
आमदार साळवी; मुख्यमंत्री शिंदेना निवेदन
राजापूर, ता. १०ः कोकणच्या किनारपट्टीवरील गावे विकसित करण्याचे अधिकार विशेष प्राधिकरण म्हणून सिडकोकडे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी सिडकोकडे विकसित करण्याचे अधिकार देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता त्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार कायम ठेवावेत, अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यांमधील सुमारे १ हजार ६३५ गावांच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार सिडकोला देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे किनारा नियमन क्षेत्र, कांदळवनाचा विस्तीर्ण पट्टा, अभयारण्य, खार जमीनी, पाणथळी आदी भागाचा विकास सिडको करणार आहे. यामध्ये कोकणातील ज्या विभागात सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र सिडकोकडे अधिकार देण्याचा निर्णय घेताना राज्य शासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता हा निर्णय घेतला आहे. विशेष प्राधिकरण म्हणून सिडकोकडे अधिकार देण्यात आल्याने त्या त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्था वा ग्रामपंचायतींना असलेले अधिकार एकप्रकारे काढून घेण्यात आल्याचे आमदार साळवी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mastani Lake Water Shortage : ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा निम्माच पाणीसाठा; कमी पावसामुळे वडकीवर टंचाईचे संकट, वन्यजीवांचे स्थलांतर वाढणार

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Mula Dam Wate : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडले; नदीपात्रात २,५०० क्यूसेकने पाणी सोडले

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Harnai Palande Beach Seagull : दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन! हर्णै-पाळंदेमध्ये झळकले 'सीगल' पक्षी, युरोपमधील वाढत्या तापमानाचा परिणाम?

SCROLL FOR NEXT