कोकण

झोळंबेत योग शिबिरास प्रतिसाद

CD

70366
झोळंबे : येथे योग शिबिर घेताना शेखर बांदेकर.

झोळंबेत योग शिबिरास प्रतिसाद
बांदा, ता. १० : पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्यावतीने आयोजित संयुक्त योगोपचार शिबिराचा सांगता समारंभ झोळंबे येथे झाला. झोळंबे येथे संयुक्त योगोपचार शिबिरामध्ये योगासने, सूक्ष्म व्यायाम, जलद व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम असा अभ्यास घेण्यात आला. पाच दिवसांचे हे शिबिर ६ ते १० मार्च या कालावधीत झाले.
शिबिराचा सांगता समारंभ कार्यक्रम योग वर्गात घेण्यात आला. त्यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुकाजी गवस यांच्या हस्ते पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी शेखर बांदेकर, युवा भारत सावंतवाडी तहसील प्रभारी मयुरेश गवंडळकर यांना शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. उपसरपंच विनायक गाडगीळ, आरोग्यसेवक जेरॉन सोच, विठ्ठल गवस, संजना गवस, विनीता गवस, चंद्रलेखा गवस, प्रकाश गवस, आदी उपस्थित होते. शिबिरामध्ये शेखर बांदेकर यांनी सतत पाच दिवस शिबिर घेतल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. सुमारे ३० साधकांची दररोज उपस्थिती या शिबिरास लाभली. झोळंबे येथे दररोज योगवर्ग नियमितपणे सुरू ठेवू, असे आश्वासन ग्रामस्थांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT